शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव पंचक्रोशीतील तलाव, विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:01 IST

अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

ठळक मुद्देनव्या पाईपलाईनने होणार सुविधा : रस्ते फोडले, अपघाताची शक्यता वाढली

साहेबराव राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.अंजनगाव बारी ग्रामपंचायतीने जलस्वराज योजनेमार्पत आठ कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात केली आहे. हे पाणी भिवापूर तलावावरून आणले जाणार आहे. यासाठी पाइप लाइनचे काम सुरू असून, नवीन टाकी व फिल्टरची कामे सुरू आहेत. गावात नवीन पाइप लाइन टाकण्यात येत आहे.येत्या दोन वर्षांत या योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध होईल. प्रत्येक घरी नळ कनेक्शन देऊन मीटर बसविण्यात येणार आहे. ही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला.पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशागावातील संपूर्ण सिमेंट रोड २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तयार झाले. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी हे रस्ते खोदावे लागले. त्यामुळे संपूर्ण गावातील रस्त्यांवर माती-चिखल पसरून हे रस्ते मातीचेच झाले आहेत, शिवाय वर्दळीमुळे वाहन अपघाताचा धोका वाढला आहे.पाण्याची सुविधा गावासाठी महत्त्वाची आहे. पाइप लाइन टाकणे झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित करून देऊ.- मंदा कळंबे,सरपंच, अंजनगाव बारी