शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव बारी आठवडी बाजारात नियमांचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST

अंजनगाव बारी : स्थानिक ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊनही येथील गुरुवारी आठवडी बाजारात गावातील व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी गर्दी करून ...

अंजनगाव बारी : स्थानिक ग्रामपंचायतीने वारंवार सूचना देऊनही येथील गुरुवारी आठवडी बाजारात गावातील व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी गर्दी करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला. यामध्ये किरकोळ विक्रेते, भाजीवाले, छोटे-मोठे व्यापारी व धंदेवाईक लोकांचा समावेश होता.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंधांची घोषणा केली. अमरावती शहरात तसा बंदोबस्तही केला. मात्र, ग्रामीण विभागात प्रशासन पोहोचत नसल्यामुळे काम नसताना व्यर्थ घराबाहेर पडणे, मास्क न घालणे, १४४ जमावबंदी कलम लागू असुनही अनावश्यक गर्दी करणे, सोशल डिस्टंसिगचे नियम न पाळणे असे प्रकार अंजनगावात दररोजच पाहायला मिळत आहेत. स्थानिक प्रशासनाला न जुमानता लोक बिनधास्त एकीकडून दुसरीकडे ये-जा करीत आहे.