शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव सुर्जीत अवैध लाकूड कटाईला उधाण

By admin | Updated: February 2, 2017 00:08 IST

अंजनगाव सुर्जी येथे अवैध लाकूड कटाईला उधाण आले आहे. परवानगीविना आणले गेलेले लाकूड खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जात आहे.

खुल्या जागेवर साठवण : वन विभागाची कारवाई शून्यअमरावती : अंजनगाव सुर्जी येथे अवैध लाकूड कटाईला उधाण आले आहे. परवानगीविना आणले गेलेले लाकूड खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवले जात आहे. तरीही हे लाकूड ताब्यात घेण्यासाठी वनविभाग का कारवाई करीत नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी अवैध वृक्षतोड, विक्रीला पूर्णपणे विराम लावण्याचा संकल्प घेतला आहे. मात्र, मीणा यांच्या संकल्पाला वनाधिकारी छेद देत असल्याचे वास्तव आहे. परतवाडा येथे दोन दिवसांपूर्वी खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवून ठेवल्याप्रकरणी आरागिरण्यांवर धाडसत्र राबवून लाकूड ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. परतवाड्यात बुधवारी सकाळी ८ वाजतापासून वनविभागाच्या चमुने आरागिरण्यांमध्ये लाकूड तपासणीचे सत्र चालविले आहे. परंतु अंजनगाव सुर्जी येथील अजीजपुरा परिसरात कडूनिंब, आंबा, महारुख, गोंदण, काटसावर आदी प्रजातींचे लाकूड साठवून ठेवण्यात आले आहे. तसेच ताज सॉ-मिलच्या मागील बाजूला सुमारे २०० टन आडजात लाकूड नियमबाह्यरित्या साठवून ठेवले आहे. अंजनगाव सुर्जीत परवानगीविना लाकूड आणले जात असताना वनविभागाला ते दिसू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. अवैध लाकू ड व्यवसायासाठी वनविभाग जबाबदार असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.अंजनगाव सुर्जी परिसरात मेळघाटातून सागवानाची तस्करी केली जाते. अंजनगाव सुर्जी परिसर अवैध लाकूड व्यवसायासाठी प्रसिद्ध असून येथे आरागिरण्यांची संख्या अधिक आहे. नदीकाठी लाकूड साठवून ठेवण्याचा प्रकार अधिक आहे. आरोपींना अटक कधी?आरागिरणी मालक, लाकूड तस्करांनी खुल्या जागेवर अवैध लाकूड साठवून ठेवण्याची शक्कल लढविली आहे. खुल्या जागेवरील लाकडाची मालकी वनविभाग सिद्ध करु शकत नाही. मात्र, खुल्या जागेवर लाकूड कोणाचे याची इत्यंभूत माहिती संबंधित वनाधिकाऱ्यांकडे असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अधिकच बिकट स्थिती आहे.