शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

अंजनगावात आमदाराच्या घराला घेराव

By admin | Updated: June 8, 2017 00:05 IST

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

तिवस्यात मुंडन : काँग्रेस आक्रमक, गुरुकुंज येथे डाव्यांचा चक्काजामलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.कर्जमाफीच्या आश्वासनामुळे राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. परंतु यासरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच काय दुष्काळी मदतही दिली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांत राज्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या उग्र भावनातिवसा : ही घोषणा म्हणजे फसवेगिरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उग्र भावना लक्षात घेऊन शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. तत्पूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.यावेळी नगरसेवक मधुकर भगत, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, पं.स सदस्य लुकेश केने, आनंद शर्मा यांच्यासह दिलीप काळबांडे, सागर राऊत, रितेश पांडव, अतुल देशमुख, रामराव तांबेकर, नरेंद्र विघ्ने, योगेश वानखडे, प्रफुल्ल देशमुख, सचिन गोरे, दिवाकर भुरभुरे, स्वप्नील गंधे, सुरेंद्र साबळे, सागर बोडखे, उमेश ठाकरे, प्रशिक शापामोहन, अंकुश देशमुख, वैभव काकडे, अंकुश बनसोड, राजिक शहा आदी उपस्थित होते.बुंदिलेंचे घेरले घरदर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचे आ. रमेश बुंदिले यांच्या अंजनगांव येथील घराला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दुपारी घेराव घातला. यावेळी शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. आ. बुंदिले घरी नसल्याने त्यांच्या स्विय सहायकांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र, आंदोलक आक्रमक असल्याने परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गुरूकुंज मोझरीत चक्काजामशेतकरी आदोलनाच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे बुधवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. यावेळी दोन्ही बाजुने वाहतूक खोळंबली होती. परिसरातील किसान एकता मंच, एसएफआय, डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. याआंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणिय ठरली. या वेळी ‘फडणवीस सरकार बदलनी है, मोदी सरकार हटानी है’ सारख्या सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. तिवसा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन समाप्त केले.