शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अवैध कत्तलखान्यांतून जनावरे गायब; कुलूप ठोकू न संचालक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:01 IST

महापालिका हद्दीत लालखडी भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सोमवारी पोलिसांनी धाडसत्र राबविले. मात्र, तत्पूर्वी कत्तलीसाठी आणलेले गोवंश गायब करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देनागपुरी गेट पोलिसांचे सर्चिंग : लालखडी परिसरात शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका हद्दीत लालखडी भागात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांमध्ये सोमवारी पोलिसांनी धाडसत्र राबविले. मात्र, तत्पूर्वी कत्तलीसाठी आणलेले गोवंश गायब करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. या कत्तलखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप ठोकले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.‘लोकमत’ने सोमवारी ‘लालखडीत अवैध कत्तलखाने’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांची एकच तारांबळ उडाली. सकाळी ११ नंतर पोलिसांनी लालखडी भागात अवैध कत्तलखान्यांची शोधमोहीम चालविली. मात्र, अवैध कत्तलखान्यांचे संचालकांनी शहरातून पोबारा केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांच्या सर्चिंगमध्ये लालखडी भागात दोन अवैध कत्तलखाने निदर्शनास आले. परंतु, ते दोनही बंद होते. सोमवारी लालखडी भागात अचानक पोलिसांची वर्दळ दिसून आल्याने स्थानिक नागरिकसुद्धा अवाक् झाले होते.काय करीत आहे नागपुरी गेट पोलीस प्रशासन?नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या लालखडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध कत्तलखाने सुरू आहेत. याची साधी कल्पनाही नागपुरी गेट पोलिसांना नाही. लालखडी परिसरातील अवैध कत्तलखान्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतरच नागपुरी गेट पोलिसांना ‘जाग’ आली, याचे आश्चर्य मानले जात आहे.लालखडी भागातील माहिती जाणून घेण्यासाठी सोमवारी पोलिसांची चमू पाठविली होती. परंतु, अकबरनगरातील त्या कारखान्यांना कुलूप होते. नेमके आतमध्ये काय चालते, हे लक्षात आले नाही. मात्र, तेथील हालचालींवर पाळत ठेवून आहोत.- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट ठाणे