शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:50 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हा पशुप्रदर्शन, शरद मोहतुरे यांची गाय ठरली चॅम्पियन

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे. शंभर वर्षाचा इतिहास असलेला तळेगाव दशासरच्या शंकरपटावरील बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे प्रतिपादन धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.जिल्हा परिषद पशू संवधन विभाग व स्थानिक पंचायत समिती यांच्या वतीने तळेगाव दशासर येथे आयोजित जिल्हास्तरीय पशू प्रदर्शनीत ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़उपाध्यक्ष दत्ता ढोमणे तर प्रमुख अतिथी जि़प़सदस्या अनिता मेश्राम, पं़स़सभापती सचिन पाटील, उपसभापती वनिता राऊत, जि़प़सदस्य प्रियंका दगडकर, वैशाली बोरकर, सुरेश निमकर, पशु सवंर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, प्रादेशिक आयुक्त विजय भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, पं़स़सदस्य गणेश राजनकर, अतुल देशमुख, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, सविता इंगळे, गटविकास अधिकारी पंकज भोयर उपस्थित होते़पशू प्रदर्शनात तब्बल ३०० मालकांनी पशुंना सहभागी केले होते़ संकरित गाय, देशी गाय, शेळी मेंढी, घोडे, कुक्कूट अशा विविध गटात जनावरांनी सहभाग होता़ दुधाळ जनावरांच्या मालकांनी अनेक बक्षिसे पटकावलीत. जिल्ह्यातील वाशीम, नांदगाव खंडेश्वर, परतवाडा, वाशीम, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वर्धा, यवतमाळच्या मालकांनी पशू आणली होती. या प्रदर्शनीसाठी पशू विस्तार अधिकारी उदय देशमुख, सुभाष इंदाणे, गोपाल तायडे, अरूण वाघ, मनोज धवणे, एस़एल माळी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले़ संचालन सुनील राऊत, प्राजक्ता राऊत, तर प्रास्ताविक मोहन गोहत्रे, तर आभार प्रदर्शन मिलिंद काळे यांनी केले़संकरित गाय चॅम्पियनवकनाथ येथील शरद मोहतुरे यांची संकरित गाय चॅम्पियन ठरली. वाशीम येथील अतुल वाटाणे यांची बैलजोडी अव्वल ठरली़ संकरित जणावरांमध्ये गाई, वळू, कालवडी असे तीन गट, तर देशी जणावरांमध्ये चार गट तसेच म्हशी, शेळी, घोडे यात गट पाडले होते़ एकूण २ लाखांचे बक्षीस देण्यात आले, तर चॅम्पियन बक्षीस १० हजार रूपयांचे होते. ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांच्या मालकांना देण्यात आली़