लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मराठी पत्रकार भवनातील निखिल पाटील आत्महत्याप्रकरणी अनिल अग्रवाल यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश विशाल गायकी यांनी शनिवारी अंतरिम जामीन मंजूर केला.न्यायासनाने तपास अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे (से) दाखल करण्याचे निर्देश दिले असून, त्यासाठी २६ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. २६ जून रोजी याप्रकरणी बचाव आणि फिर्यादी पक्ष यांच्यात अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.दरम्यान, निखिलच्या आई अरुणा पाटील या शनिवारी अनपेक्षितपणे न्यायालयात पोहोचल्या. त्यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांची भेट घेतली. निखिल आत्महत्याप्रकरणी अनिल अग्रवाल यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अग्रवाल यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी मला सहायक सरकारी वकील सुनील देशमुख यांची विधिसेवा उपलब्ध व्हावी, अशा आशयाची मागणी असलेला अर्ज त्यांनी गणोरकर यांच्याकडे सादर केला. अर्जानुरूप निर्णय झाल्यास, जामिनाच्या युक्तिवादासाठी पुढील तारखेला वकील सुनील देशमुख हे न्यायासनासमोर उपस्थित राहतील. अर्जदाराकडून वकील प्रशांत देशपांडे यांनी काम पाहिले.आईचा मात्र तीव्र आक्षेपनिखिलच्या आईने न्यायालयाबाहेर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मी दोन मागण्यासांठी न्यायालयात आले आहे. पहिले कारण - मला ज्यांच्यावर विश्वास आहे, असे सरकारी वकील सुनील देशमुख हे अनिल अग्रवाल यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी मला उपलब्ध करून दिले जावे. दुसरी मागणी - अनिल अग्रवाल हेच माझ्या मुलाच्या आत्महत्येला कारणीभूत असल्यामुळे त्यांना न्यायालयाने जामीन देऊ नये. अटक करावी. मी मुलगा गमावला. सर्वस्व गमावले. ते दु:ख माझ्याइतके कुणाला कळणार? मुलाच्या न्यायासाठी अखेरपर्यंत लढणे हेच आता माझे ध्येय आहे.
अनिल अग्रवाल यांना अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST
निखिलच्या आई अरुणा पाटील या शनिवारी अनपेक्षितपणे न्यायालयात पोहोचल्या. त्यांनी प्रमुख जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांची भेट घेतली. निखिल आत्महत्याप्रकरणी अनिल अग्रवाल यांनी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. अग्रवाल यांच्या जामिनाला विरोध करण्यासाठी मला सहायक सरकारी वकील सुनील देशमुख यांची विधिसेवा उपलब्ध व्हावी, अशा आशयाची मागणी असलेला अर्ज त्यांनी गणोरकर यांच्याकडे सादर केला.
अनिल अग्रवाल यांना अंतरिम जामीन
ठळक मुद्देआत्महत्या प्रकरण : निखिलची आई पोहोचली न्यायालयात