शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त आदिवासींची वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराबंदी

By admin | Updated: July 13, 2017 00:05 IST

नखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले.

चुनखडी येथील प्रकरण : आदिवासींना डिवचल्याने झाला अतिरेक, सहा तास नजरकैद लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चुनखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले. पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर त्यांची सुटका झाली. मागील आठवड्यात चुनखडी येथे जेसीबी, हत्ती नेऊन अतिक्रमित जमीनीवर आदिवासींनी केलेली शेती उद्धवस्त करण्यात आली. आदिवासींना १२ जुलैपर्यंत मुदत देऊनही एक दिवस आधीच सिपना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने उद्रेक झाला. वनाधिकाऱ्यांनी डिवचले सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असताना आदिवासींनी एवढे पीक घेऊ द्या, त्यानंतर नियमाने दावे रद्द झाल्यास शेती करणार नाही, अशी मागणीवजा विनंती केली होती. मात्र, त्याला न जुमानता पिके नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पिके नष्ट केल्यावर वनाधिकारी चुनखडी गावात शिरले आणि आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी त्या अधिकाऱ्यांना थेट घेराव घातला व नजरकैदेत ठेवले. सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो आणि शिंदे नामक वनकर्मचाऱ्याने अतिरेक केल्याचे आदिवासींनी सांगितले. वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असेल तर वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी पेरणीपूर्वीच ही कारवाई का केली नाही. यामध्ये तेच दोषी आहेत. त्यामुळे यावनकर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रथम निलंबित करण्याची मागणी मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केली आहे. यासंपूर्ण प्रकरणात लोकप्रतिनिधींना खोटे आश्वासन देऊन गोरगरिब आदिवासींवर अन्याय करणाऱ्यांना आता जमेल तसे उत्तर दिले जाणार असल्याचे भिलावेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांसह जवळपास ७० कर्मचाऱ्यांना चुनखडीतील आदिवासींनी घेराबंदी करीत नजरकैद केल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बोलवा, अशी मागणी संतप्त आदिवासींनी केली. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आदिवासींनी केलेली शेती ही अतिक्रमण ठरते. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदिवासींची पिके काढल्याने गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मध्यरात्री पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यावर त्यांची सुटका झाली. - ए.एस. मोळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, जारिदा