शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्याचा विद्युत कार्यालयावर हल्ला

By admin | Updated: June 19, 2015 00:38 IST

सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला.

नांदगाव पेठ : सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याला कंटाळून येथील एका संतप्त शेतकऱ्याने थेट विद्युत कार्यालयावर हल्ला चढविला. गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला. या घटनेत संगणक, प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली. येथील शेतकरी तथा माजी सरपंच उदय भुस्कडे सकाळी शेतामध्ये गेले असता त्यांना कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी लगेच अभियंता राठोड यांना भ्रमणध्वनीवर सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. मात्र, एकही कर्मचारी वेळेवर न पोहोचल्याने भुस्कडे यांनी थेट विद्युत कार्यालय गाठून लोखंडी पाईपने तोडफोड करण्यास सुरूवात केली. यामध्ये संगणक व प्रिंटरसह अन्य साहित्याची नासधूस झाली. जवळपास चाळीस हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती मिळातच सहाय्यक पोलीस आयुक्त महेश जोशी, एपीआय एल. एम. गवंड सह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता. मात्र पोलिसात तक्रार दाखल न करण्यात आल्याने पुढील कार्यवाही झाली नाही. गेल्या अनेक दिवसापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी व सामान्य नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुस्कडे यांनी हल्ला चढविल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी या कृत्याचे समर्थन केले असले तरी विद्युत विभाग यावर काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)