शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेतून अंगणवाडींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:41 IST

अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत.

ठळक मुद्देशासनाची परवानगी शौचालय बांधकाम, दुरुस्तीसाठी मिळणार निधी

जितेंद्र दखने।आॅनलाईन लोकमतअमरावती : अंगणवाडी बालकांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून इमारतीची कामे केली जाणार आहेत. अंगणवाडी शौचालय बांधकामे व अंगणवाडी इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामांना शासनाने परवानगी दिली आहे. इमारत उभारण्यासाठी शासनाच्यावतीने जिल्हा वार्षिक निधीतून ४ कोटी २३ लाख ६० हजारांची मंजुरी देण्यात आली आहे.जिल्हा वार्षिक योजनेमधून अंगणवाडी बांधकामासाठी लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे निधी अर्थसंकल्पित करण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान, शासननिर्णयामुळे सन २०१७-१८ पासून अंगणवाडी बांधकामासाठी राज्यस्तरावर ४ कोटी २३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच केंद्र शासनाकडून इमारत बांधकामासाठी ६० टक्के आणि राज्य शासनाच्या ४० टक्के निधीद्वारा कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. शासनाच्या धोरणानुसार जिल्हा वार्षिक निधीतून नवीन अंगणवाडी बांधकामाबरोबरच जुन्या अंगणवाड्यांमध्ये शौचालय नसणाऱ्या ठिकाणी शौचालयाची कामे तातडीने करण्यात येणार आहे. न्ावीन अंगणवाडी बांधकाम, अंगणवाडी शौचालय, इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीच्या सुधारणेस मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी दुरुस्ती तसेच ज्या अंगणवाडीमध्ये शौचालय नाही, अशा ठिकाणी बांधकामासाठी ५० टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, जि.प. महिला व बालविकास अधिकारी यांच्या मान्यतेने अंगणवाडी बांधकामासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधीतून ५० टक्के प्रमाणे विभागणी करून घेणयत येणाºया कामाचा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यात यावा तसेच वित्तीय वर्ष संपण्याचा कालावधी विचारात घेऊन तातडीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने दिल्या आहेत.ज्या अंगणवाड्यांंमध्ये शौचालये नाहीत, अशा ठिकाणी शौचालयाची बांधकामे प्राधान्याने घ्यावीत, अंगणवाडी इमारतीमधील किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, ही कामे करताना शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून अंगणवाडीचे कामे मंजूर करावे, अशा स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. अंगणवाडी केंद्राच्या किरकोळ दुरुस्ती व शौचालयाची कामे करण्याबाबत शासनाचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार शासननिर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अमरावती जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कै लास घोडके यांनी सांगितले.बंद शौचालय सुरू होणारशासनाच्या नवीन निर्णयामुळे जिल्हा वार्षिक निधीतून (डिपीसी) अंगणवाडी केंद्राची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच शौचालय दुरुस्ती आणि किरकोळ दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध झाला आहे. परिणामी वर्षानुवर्षे दुरुस्तीअभावी रखडणाऱ्या अंगणवाड्या सुस्थितीत येणार आहेत. याशिवाय शौचालयावर पाणी टाकी उपलब्ध करून देण्यासाठीही निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी साठवणीअभावी बंद असलेली शौचालये सुरू होणार आहेत.