शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप

By admin | Updated: March 21, 2017 00:19 IST

शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्च अशा दोन दिवसांच्या संपावर आहेत.

आंदोलन : जिल्हा कचेरीसमोर धरणेअमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्च अशा दोन दिवसांच्या संपावर आहेत. या संपादरम्यान अंगणवाडी कर्मचारी व सेविकांकडून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सतत आंदोलनाच्या माध्यमातून मानधनवाढ व अन्य प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली आहे. महिला बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयटक व संयुक्त कृती समिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन मानधनवाढ व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासन निर्णय काढण्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. आयटक व संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून नुकताच मुंबई येथे मोर्चादेखील काढण्यात आला. मात्र मानधनवाढ व अन्य मागण्या निकाली काढण्यासाठी शासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आयटकच्यावतीने सोमवार २० आणि मंगळवार २१ मार्चला दोन दिवसांचा संपाचा निर्णय घेतला आहे. या संपामध्ये बी. के. जाधव, प्रमिला राव, मिरा कैथवास, ममता सुंदरकर व अन्य अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत. (प्रतिनिधी)