शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अन् सावलीनेही सोडली साथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:08 IST

अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाचे.

ठळक मुद्देअमरावतीकरांनी अनुभवला झिरो शॅडो डे : फेसबुकच्या डीपीवर धूम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाचे.विशिष्ट खगोलीय परिस्थितीमुळे सूर्य डोक्यावर येऊन काही काळासाठी सावली गायब होते अर्थात पायाखाली एकवटते. त्याला झीरो शॅडो डे असे म्हटले जाते. मागील काही दिवसांपासून राज्यभरात निरनिराळ्या दिवशी निसर्गाचा हा आविष्कार अनुभवास आला. अमरावतीमध्ये शुक्रवारी नागरिकांनी त्याचा प्रत्यय घेतला. दुपारी १२ वाजता प्रखर ऊन जाणवत होते. यादरम्यान व्यक्ती व वस्तूची सावली तिच्या आसपास दिसत होती. मात्र, १२.३० वाजता सावली जवळपास गायब झाल्याचे अनुभव नागरिकांनी घेतला. दुपारी १ वाजेपर्यंत सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडत असल्याने अर्धा तास सावलीनेही साथ सोडली होती.अनेकांनी भर उन्हात घराबाहेर येऊन हा प्रकार अनुभवला. विशेषत: चिमुकल्यांंनी या प्रकाराची चांगलीच मौज लुटली. ज्येष्ठांनी घरातील मुलांना निसर्गाचा आविष्कार दाखवला. सावली गायब झाल्याने नागरिकांमध्ये निसर्गाबद्दलचे कुतूहल पाहायला मिळाले.का झाली सावली गायब?सूर्याचे उत्तरायण ते दक्षिणायन प्रवासातील दोन दिवस सूर्य पृथ्वीच्या अगदी मध्यावर येतो. सूर्यकिरणे थेट सरळ पडत असल्याने प्रत्येक वस्तूची सावली गायब झाल्यासारखी वाटते. २३ डिसेंबरपासून २१ जूनपर्यंत सूर्याचे उत्तरायण सुरू राहणार आहे. यंदाचा शून्य सावलीचा दिवस हा उत्तरायण प्रवासामधील असून, पुढील दक्षिणायन सुरू झाल्यावर पुन्हा असा दिवस अनुभवता येणार आहे.सोशल मीडियावर फोटोसोशल मीडियावरही झीरो शॅडो डे चांगलाच गाजला. अनेक तरुण-तरुणींनी आपली सावलीविरहित छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड केली. अनेकांच्या फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपच्या डीपीवर ही छायाचित्रे झळकत होती.