शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक रंगातून साकारली प्राचीन चित्रशैली

By admin | Updated: January 11, 2016 00:05 IST

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारात विविध शहरातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगातून भारतीय प्राचीन चित्रशैली साकारली.

कार्यशाळा : २५४ विद्यार्थ्यांचा सहभाग अमरावती : पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या आवारात विविध शहरातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगातून भारतीय प्राचीन चित्रशैली साकारली. गृहशास्त्रविभाग, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व १६ जानेवारी या दोन दिवस ग्रीन टेक्सटाईल्स, फॅशन्स, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नैसर्गिक रंग वाचवतील निसर्ग’ यासंकल्पनेवर आधारित पारंपरिक भारतीय चित्रकला स्पर्धेच्या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उदघाटनाप्रंसगी संचालक संगिता यावले, वाईल्ड लाईफ अ‍ॅन्ड एन्व्हारमेंट सोसायटीचे जयंत वडतकर, गजानन वाघ, गृहशास्त्रविभागप्रमुख तथा समन्वयक अंजली देशमुख, मार्गदर्शक मिलींद देशपांडे उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेच्या उदघाटनानंतर गृहशास्त्र विभाग प्रमुख अंजली देशमुख यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना २० प्रकारचे विविध नैसर्गिक रंग तयार केले. त्यामध्ये झेंडू रंग, काथाचा रंग, डाळिंबाचे सालाचा रंग, पारिजातकाच्या दांड्यांचा रंग, तांदळाचा पांढरा रंग, शेन्द्री फळांचा रंग, पळसफुलांचा रंग अशा विविध नैसर्गिक स्त्रोतांपासून तयार केलेले रंग विद्यार्थ्यांना चित्र काढण्याकरिता देण्यात आले होते. दोन दिवसीय कार्यशाळाअमरावती : नागपूर, अकोला, पुणे, वर्धा व अन्य शहरातील चित्रकला महाविद्यालयातून आलेल्या २५४ विद्यार्थ्यांनी भारतीय प्राचीन चित्रशैलीवर चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. विविध प्राचीन कलाकृतींचे दर्शन घडविणारे अप्रतिम जीवंत चित्रण विद्यार्थ्यांनी रेखाटले. या स्पर्धेकरिता विनया कांत, प्राची गिरी, दीपाली धवने, शुंभागी शिराळकर, अंजू पठाडे, शारदा डोंगरे, मंजुषा वाठ, जयंत वडतकर, गजाजन वाघ, श्रीकांत वऱ्हेकर, गौरव कडू, अरविंद कानस्कर, प्रवीण रघुवंशी यांचे सहकार्य लाभले. राज्यातील विद्यार्थी, बुटिक डिझायनर्स, छंद समूह तसेच गृहिणींमधील सुप्त गुण शोधून त्यांना व्यवसाय व उद्योगामध्ये ओळख मिळावी, या हेतुने ही व्दि-दिवसीय कार्यशाळा स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. प्राचीन चित्रशैलीवर आधारित राज्यात प्रथमच ही स्पर्धा व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)