शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ बसंती, अपंग बसंतचा अविस्मरणीय विवाह सोहळा

By admin | Updated: April 26, 2015 23:57 IST

सनईचे मंगल सूर... गीतांची मैफल... आनंद आणि प्रसन्न वातावरणात रविवारी अनाथ बसंती आणि अपंग बसंत यांचा विवाह सोहळा..

दिग्गजांची हजेरी : महापौरांनी केले कन्यादानअमरावती : सनईचे मंगल सूर... गीतांची मैफल... आनंद आणि प्रसन्न वातावरणात रविवारी अनाथ बसंती आणि अपंग बसंत यांचा विवाह सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत पार पडला. मुलीचे कन्यादान महापौर चरणजितकौर नंदा, तर मामाची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी निभावली.बडनेरा मार्गावरील महेश भवन येथे हा सोहळा पार पडला. सायंकाळी ७ वाजता मंगलाष्टकांच्या स्वरात बसंती व बसंतचा विवाह लावण्यात आला. तत्पूर्वी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मारवाडी समाजाच्या पद्धतीने या दोन्ही जोडप्यांचा विधीवत विवाह पार पडला. या सोहळ्याला हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, आ. रवी राणा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, कुलगुरु मोहन खेडकर, अनंत गुढे, सुलभा खोडके, संजय खोडके, नानक आहुजा, सुरेश सावदेकर, रवींद्र खांडेकर, माधुरी चेंडके, मंजूषा जाधव, नीलिमा काळे, प्रवीण ठाकरे, तहसीलदार शामकांत मस्के, धनंजय धवड, दीपसिंग बग्गा, पी. जी. गडेकर, गोविंद कासट, बिट्टू सलुजा, चुन्नीलाल मंत्री, आर.बी. अटल, ज्योती अग्रवाल, अधिनंदन पेंढारी, राजाभाऊ मोरे, सोमेश्वर पुसतकर, राजेश महात्मे, मिलिंद बांबल, रश्मी नावंदर, वसंत हरणे, पूजा उमेकर आदींची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यातील वधू बसंती ही नाशीक येथे कुंभमेळ्यात सापडली होती. त्यानंतर तिचे संगोपन वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य बालगृहात झाले. बडनेरा येथील परमानंद अग्रवाल यांनी जोडप्यांच्या नावे ५० हजार हजारांचा धनादेश सुपूर्द केला. जेवण व हॉलची व्यवस्था बुधवारा येथील आझाद हिंद मंडळाचे सोमेश्वर पुसतकर व विशाल अग्निहोत्री यांच्या पुढाकाराने करण्यात आली. शंकरबाबा पापळकरांची अशीही तळमळअनाथ बसंतीच्या विवाह सोहळ्याला येणाऱ्या वऱ्हाडी, निमंत्रितांचे मोठ्या सन्मानाने हात जोडून शंकरबाबा पापळकर स्वागत करताना दिसून आले. पायात टायरी चप्पल, विस्कटलेले केसं, डोक्यावर टोपी, अतिशय साधे राहणीमान असलेल्या शंकरबाबांनी सोळाव्या मानसकन्येच्या विवाह सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक निमंत्रिताचे भावपूर्ण स्वागत केले. त्यांची तळमळ ही सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारी दिसत होती.