शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या कंत्राटदाराला प्रतिदिन पाच हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

अमरावती : शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला उच्चदाबाने पाणीपुरवठा व्हावा, शहरातील वाढलेल्या नवीन वस्तीतील नागरिकांना नळकनेक्शन मिळावे, याकरिता शहरासाठी ...

अमरावती : शहरातील प्रत्येक नळ कनेक्शनधारकाला उच्चदाबाने पाणीपुरवठा व्हावा, शहरातील वाढलेल्या नवीन वस्तीतील नागरिकांना नळकनेक्शन मिळावे, याकरिता शहरासाठी ९३ कोटींच्या निधीतून ‘अमृत’ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. मात्र, कंत्राटदाराने कामात दिरंगाई केल्याने ही योजना तीन वर्षांपासून रखडली आहे. अमृतच्या कंत्राटदाराला प्रतिदिन पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. सदर कंत्राटदाराकडून आतापर्यंत तीन कोटींचा दंड जीवन प्राधिकरणने वसूल केला आहे.

अमृत योजनेचे ७८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मजीप्राच्या अधिकाऱ्याने दिली. शहरात ऑक्टोबर २०१६ मध्ये सदर योजनेला मंजूरात मिळाली. ९३ कोटींच्या निधीची तरतूद होऊन हे काम नाशिक येथील एका कंपनीला मिळाले. काही दिवस काम सुरळीत झाले. मात्र, त्यानंतर कामात दिरंगाई व कामे मंदगतीने झाल्याचा कंपनीवर ठपका ठेण्यात आला. आधी प्रतिदिन हजारो रुपयांचा दंड आकारून त्या कंपनीच्या बिलातून तीन कोटींची वसुली मजीप्राने केली. मात्र, दंड हा नियमबाह्य वसूल केल्याचे सांगत पी.एल. आडके कंपनीने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे जीवन प्राधिकरणने १ कोटी १४ लाख रुपये कंपनीला परत केले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने योजनेचे काम थांबले आहे. ही योजना पूर्णत्वास जाण्यास आणखी किती कालावधी लागेल व शहरातील नवीन भागात राहण्यास गेलेल्या नागरिकांना ‘अमृत’ योजनेचे पाणी केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राजकीय पुढाऱ्यांनी सदर योजनेच्या कामाचा आढावा घेऊन सदर काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

बॉक्स

पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे काम ५० टक्के

या योजनेतून ८० किमीची पाईपलाईन भूमिगत करण्यात आली. तसेच नऊ पिण्याच्या पाण्याच्या उंच टाक्या बांधण्यात आल्या आहेत. तपोवन येथे ६१ दलघमी क्षमतेचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी ३०.५० दलघमीचे काम अर्धे झाले आहे. पण ३०.५० दलघमीचे काम अपूर्ण असल्याने ही योजना रखडली आहे. या योजनेला २ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदत होती. परंतु कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे या योजनेचे काम लांबणीवर पडले आहे.

दोन कोट आहेत.