लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेच्या पाइपलाइनच्या कामाकरिता अनेक नादुरुस्त रस्ते खोदून ठेवलेत. परंतु दुरुस्ती केलेली नाही. यावर उपस्थित नगरसेवकांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना बुधवारच्या बैठकीत खडेबोल सुनावले. कामाचे नियोजन करून दर आठ दिवसांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी दिले.शहरातील जलवितरण, अमृत पाणीपुरवठा योजनेचा आढावा व भुयारी गटार योजनेचे अपडेट जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित होती. यावेळी उपमहापौर कुसूम साहू, बाळासाहेब भुयार, सुनील काळे, बबलू शेखावत, भारत चौधरी, अब्दुल नाजीम अब्दुल रऊफ, चेतन पवार, दिनेश बुब, अजय सारसकर, संजय नरवणे, मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, प्रशांत वानखडे, संध्या टिकले, मजीप्राचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार, शहर अभियंता रवींद्र पवार, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण आदी उपस्थित होते. नगरसेवक, नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील त्यांचा तातडीने निपटारा करून अहवाल सादर करावा, रस्ते दुरुस्ती करण्याबाबत चेतन पवार, मिलींद चिमोटे, विलास इंगोले यांनी सूचना केली.नियमित पाणीपुरवठ्यासाठी तीन महिने अवधीसभागृहात आश्वासन दिल्याप्रमाणे शहराला नियमित पाणीपुरवठा का नाही, यावरून पदाधिकाºयांच्या भावना तीव्र होत्या. योजनेचे काम ८३ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या दोन ते तीन महिन्यांत काम पूर्ण होईल व त्यानंतर संपूर्ण शहरात रोज पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मजीप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील लिकेजेस आहेत, ते तातडीने बंद करावे व भुयारी गटार योजनेंतर्गत ओव्हरफ्लो होत असलेले चेंबर तात्काळ दुरुस्त करावे आदी सूचना बैठकीत देण्यात आल्यात.
अमृत योजनेच्या कामावरून अधिकाऱ्यांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST
महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेच्या पाइपलाइनच्या कामाकरिता अनेक नादुरुस्त रस्ते खोदून ठेवलेत. परंतु दुरुस्ती केलेली नाही. यावर उपस्थित नगरसेवकांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना बुधवारच्या बैठकीत खडेबोल सुनावले. कामाचे नियोजन करून दर आठ दिवसांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी दिले.
अमृत योजनेच्या कामावरून अधिकाऱ्यांना सुनावले
ठळक मुद्देआठ दिवसांनी अहवाल हवा : आढावा बैठकीत महापौर, आयुक्तांचे निर्देश