अमरावती : महाराष्ट्र शासनाचे मुंबईच्या उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ. सोनाली रोडे यांची नियुक्ती केली आहे. त्या अमरावतीच्या सुपुत्री आहेत. मुंबईत पदावर रुजू झाल्यानंतर अमरावतीत आगमनप्रसंगी सोनाली रोडे यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रफुल्ल गवई यांनी सत्कार केला. रोडे यांचे शालेय शिक्षण होलिक्रॉस मराठी शाळेत व उच्च शिक्षण शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेत झाले. शासकीय सेवेमध्ये २००१ पासून इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून मुंबई येथे त्या रुजू झाल्या. त्यानंतर अमरावती व कोल्हापूर येथे अध्यापन केले. याशिवाय कोल्हापूरच्या भारतीय सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या संचालक म्हणून कार्य केले. याप्रसंगी विशाल रोटे, हर्षवर्धन रोटे, मनीष सिरसाट, समिधा रोडे, सारिका रोडे, किरण धार्त्र आदी उपस्थित होते.
अमरावतीची सुपुत्री मुंबईची उच्च शिक्षण सहसंचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST