शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोषण अभियानात अमरावती जिल्हा परिषद राज्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:58 IST

मान उंचावली : मुंबई येथे गौरव 

अमरावती : पोषण अभियान अंतर्गत जनआंदोलन या उपक्रमामध्ये अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने उत्कृष्ट कार्य केले. यात राज्यात जिल्हा परिषदेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यासंबंधी पुरस्काराचे वितरण ६ मार्च रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात  राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री  यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी हा पुरस्कार विभागातर्फे स्वीकारला. यावेळी कार्यक्रमाला महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. एम. कुंदन व आयुक्त इंद्रा मालो व इतर गणमान्य महिला उपस्थित होत्या. 

२०२९-२०  या वर्षात संपूर्ण भारतभर पोषण अभियानाअंतर्गत जनआंदोलन हा उपक्रम राबवण्यात आला होता. सदर उपक्रमांमध्ये पोषण विषयाशी संबंधित विविध कार्यक्रम, रॅली, गृहभेट आदी उपक्रमांमधून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोषणाबाबत जनजागृती करणे अभिप्रेत होते. या उपक्रमातून अमरावती जिल्ह्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त कार्यक्रमांची नोंद केल्याने जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. सोबतच उत्कृष्ट प्रकल्प या संवर्गातून अमरावती जिल्ह्यातील वरूड या प्रकल्पाने राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला.

महिला व बाल कल्याण विभागातील सीएएसचे जिल्हा समन्वयक शिवानंद वासनकर यांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट जिल्हा समन्वयक हा बहुमान पटकाविला.  जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्या एकत्रित परिश्रमातून या कामगिरीची नोंद झालेली आहे.