शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत जलसंधारण विभागाचा पेपर फुटला?, परिक्षार्थींमध्ये गोंधळ

By उज्वल भालेकर | Updated: February 21, 2024 17:28 IST

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती.

अमरावती: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातील वर्ग दोन अधिकारी पदासाठी सुरू असलेल्या परीक्षेचा पेपर बुधवारी फुटल्याने परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला. शहरातील सिटीलँण्ड येथील ऑनलाइन परीक्षा केंद्रावर मृद व जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून संबधित एका परीक्षार्थीला उत्तरे पुरविण्यास मदत केल्याचा अरोप परीक्षार्थींकडून होत आहे. त्यामुळे काही वेळा करीता परीक्षा केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस प्रशासन देखील केंद्रावर पोहचले होते. 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृदू व जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. यानुसार २० व २१ फेब्रुवारी रोजी तीन पाळीमध्ये ही ऑनलाइन परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथील परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघड झाली. विशेष म्हणजे, मृदू व जलसंधारण विभागाच्या एका अधिकाऱ्यानेच प्रश्नपत्रिका फोडून उत्तरे पुरविण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शहरातील सिटीलँण्ड येथील एका अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडण्यास मदत केल्याचा परीक्षार्थींचा अरोप आहे. याचे पुरावेही काही विद्यार्थ्यांनी बाहेर पाठवले आहे. यापूर्वीही अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी झालेल्या तलाठी परीक्षेतही अशाच गोंधळ झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा देणऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. मृद व जलसंधारण विभागातील पेपर फुटीचा प्रकार लक्षात येताच एकच गोंधळ केला. संबधित परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याची मागणी यावेळी परीक्षार्थींकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती