शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावती विद्यापीठाचा मानांकन दर्जा घसरला, ‘बी’ प्लस श्रेणीवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:52 IST

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मानांकन दर्जा घसरला आहे. २०१६ साली ‘ए’ प्लस असताना आता ‘बी’ प्लस श्रेणीवर समाधान मानावे लागले आहे.

ठळक मुद्दे‘नॅक’मू्ल्यांकन चमुचा अहवालसंशोधन आणि विद्यार्थी प्रगती माघारल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मानांकन दर्जा घसरला आहे. २०१६ साली ‘ए’ प्लस असताना आता ‘बी’ प्लस श्रेणीवर समाधान मानावे लागले. ९ ते ११ ऑगस्ट या दरम्यान ‘नॅक’ पिअर चमुने विद्यापीठाचे मू्ल्यांकन केले असून, तसा वस्तुनिष्ठ अहवाल वजा दणका दिला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा शैक्षणिक कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते. (Amravati University gradation dropped)

तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी अविनाश मोहरील यांच्याकडे ‘नॅक’संदर्भातील मोठी जबाबदारी सोपविली होती. मात्र मोहरील यांनी घेतलेल्या पुढाकारावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. विद्यापीठाला याआधीच्या मुल्यांकनात नॅकने सीजीपीए ३.०७ सह ‘अ’दर्जा बहाल केला होता. मात्र, यंदा ‘नॅक’ने विद्यापीठाच्या गुणदानात मोठी घट करून केवळ २.९३ एवढाच पॉईंटर दिल्याने बी प्लस दर्जावर समाधान मानावे लागले.

दर्जा घसरला, जबाबदारी कुणाची?

काही अधिकाऱ्यांच्या शहाणपणामुळे विद्यापीठाला पुढील पाच वर्षांसाठी ‘बी’ प्लस दर्जावर कायम राहावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्याचे देखील भविष्यकालीन नुकसान गलथान काराभारामुळे झाले आहे. खालावलेला शैक्षणिक स्तर आणि ‘नॅक’समोर भूमिका मांडण्यात पडलेली कमतरता याला नेमके जबाबदार कोण याचा शोध विद्यापीठ घेणार का? संबंधितांवर चौकशी नेमणार का ? असा प्रश्न सध्या विद्यापीठ वर्तुळात चर्चिल्या जात आहे.

अतिशहाणपण नडले

विद्यापीठात नॅक समितीचे आगमन होण्यापूर्वीपासून नॅकशी संबंधित खरेदी आणि अन्य बाबींचे कंट्रोल एकछत्री होते. कमी खर्च आणि ज्यादा दिखाऊपणाच्या नादात विद्यापीठाला फटका बसला आहे. वरिष्ठांना डावलून नवख्या अधिकाऱ्यांकडे कारभार गेल्याने विद्यापीठाला देखील ‘बी’ प्लस दर्जावरच समाधान मानावे लागले आहे.

परीक्षा प्रणाली, रिसर्चवर ठपका

विद्यापीठाकडे स्वत:ची ऑनलाईन परीक्षा प्रणाली नाही. ऑनलाईन परीक्षांचे संचलनात अपयशी ठरल्याची नोंद ‘नॅक’ने घेतली आहे. प्राध्यापकांची कमतरता, शैक्षणिक सुविधांचा अभाव या बाबी देखील अधोरेखीत केलेल्या आहेत. विशेषत: अनेक विभागांमध्ये संशोधन नावालाही आढळले नाही. रिसर्च पेपर आणि संशोधनाशी निगडीत अनेक बाबीत विद्यापीठ माघारल्याचे नॅक’ने नोंदविले.

गतवेळी विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए’ प्लस श्रेणी होती. आता ‘बी’प्लस श्रेणी मिळाली आहे. संशोधन व विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीवर ‘नॅक’ चमुने बोट ठेवले, ही बाब चिंतनीय आहे. कुठे चुकले याविषयी मूल्यांकन करावे लागेल.

- तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र