शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:27 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे.

ठळक मुद्देसिनेट सभेत निर्णय परीक्षा अर्जासोबत आईचे नाव नमूद करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे. येत्या काळात पदवीवरही आईचे नाव असेल, असा निर्णय शुक्रवारी सिनेट सभेत घेण्यात आला. गजानन कडू यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर कुलगुरूंनी तसा निर्णय जाहीर केला.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करून वितरित केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठांनीदेखील गुणपत्रिका, पदवीवर आईचे नाव अंकित करून विद्यार्थ्यांना सोपविल्या आहेत. मात्र, गुणपत्रिकेवर आईचे नाव असावे, या आशयाचा प्रस्ताव सिनेट सदस्य गजानन कडू यांनी सादर केला. प्रारंभी येत्या शैक्षणिक सत्रापासून ही बाब शक्य नसल्याची नकारघंटा परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांची होती. मात्र, या प्रस्तावाला विवेक देशमुख यांनी बळ दिले. अशातच भीमराव वाघमारे यांनीदेखील उडी घेतली. वादंग होऊ नये, यासाठी कुलगुरू चांदेकरांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, विवेद देशमुख यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या ‘गोलमाल’ भूमिकेवर जोरदार टीका केली. एखादा नवीन सदस्य धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रस्ताव दाखल करतो. मात्र, सदर सदस्याला बोलू न देता तो प्रस्ताव मंजूर झाल्याची बोळवण केली जाते, असा आरोप विवेक देशमुख यांनी केला. दरम्यान, परीक्षा अर्ज सुधारित करण्यासाठी विद्वत परिषदेसमोर हा विषय निर्णयार्थ आहे. याविषयी निर्णय होताच पदवी, गुणपत्रिकेवर वडिलांसह आईचे नावसुद्धा प्रकाशित होईल, असा ठाम विश्वास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सभागृहात दर्शविला. परीक्षा अर्जात आजमितीला एका कॉलममध्ये आईचे नाव आहे. त्यामुळे गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांना देणे शक्य असल्याचे भीमराव वाघमारे यांनी सांंगितले. कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सिनेट सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक सत्रापासून गुणपत्रिकांवर आईचे नाव असेल, असा निर्णय दिला.

‘‘परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून तीन वर्षांनंतर पदवीवर आईचे नाव प्रकाशित असणार आहे. सिनेट सभेत झालेल्या निर्णयानुसार गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करूनच विद्यार्थ्यांना ती दिली जाईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.

टॅग्स :AmravatiअमरावतीEducation Sectorशिक्षण क्षेत्र