शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:06 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे.

ठळक मुद्देविजय भटकर यांची उपस्थिती : प्रकल्प ठरणार आर्कषण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्ती, प्रतिभेला वाव मिळावा म्हणून २००६ मध्ये तत्कालीन राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या कल्पनेतून आविष्कार संशोधन महोत्सवाला सुरुवात झाली. या स्पर्धेत मानव्यविद्या, भाषा, कला व ललितकला, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी व प्राणी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी विभागांमध्ये विद्यार्थी संशोधनात्मक प्रकल्प सादर करतील. महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.यापूर्वी १७ व १८ डिसेंबर रोजी ही स्पर्धा अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातून वर्गवारी व स्तरामधून निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रकल्प सादरीकरण होईल.२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी भवन येथे आविष्कार स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य जी. गोपाल रेड्डी यांच्या हस्ते होणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.२७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता विद्यापीठ दृक्श्राव्य सभागृहात समारोपीय कार्यक्रम होईल. त्याचे अध्यक्षस्थान कुलगुरू मुरलीधर चांदेकर भूषवतील. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्रालयाच्या उन्नत भारत अभियानाचे अध्यक्ष पद्मभूषण विजय भटकर राहणार असून, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले संशोधन सादर करावे, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, आय.आय.एल.चे संचालक डी.टी. इंगोले व आविष्कार समन्वयक आनंद अस्वार यांनी केले आहे.