शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

अमरावतीकरांमध्ये चोरट्यांची दहशत

By admin | Updated: June 12, 2014 23:42 IST

पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत.

अमरावती : पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात घरफोडीच्या मालिका सुरुच आहेत. दरदिवसाला चोरीच्या घटनांमधून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला जात आहे. चोरट्यांच्या हैदोसामुळे अमरावतीकर चोरट्यांच्या दहशतीत आले आहेत. मात्र चोरीच्या घटना रोखण्यात आतापर्यंत पोलिसांना यश मिळाले नाही. एक महिन्यातील वाढत्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.उन्हाळी सुट्या, लग्न सराईचा मोसम असल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची संधी साधून चोरटे बंद घरांना लक्ष्य करीत आहेत. चोरट्यांनी महिनाभरात शहरातील राजापेठ, फे्रजरपुरा व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग, घरफोडी व दरोडे टाकून करोडो रुपयांचा ऐवज लंपास केला. परंतु या टोळीला पकडण्यासाठी अद्यापही पोलिसांना यश आले नाही. यासाठी रात्रकालीन गस्त वाढविण्यात आली परंतु ही गस्त कुचकामी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्वी चार्ली कमांडो शहरात १२ तास गस्त घालत होती. कमांडोंना काही विश्रांती मिळण्यासाठी त्याची गस्त १२ तासांवरुन आठ तास करण्यात आली. घरफोडींच्या घटनांवर आळा बसविण्यासाठी चार्ली कमांडोना निर्देश देण्यात आले. परंतु कमी तासांची ड्युटी असतानाही चार्ली कमांडो कामचुकारपणा करीत असल्याचे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन स्पष्ट होते. ते रात्रकालीन गस्त करण्याऐवजी घरी झोपा काढत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड झाले आहे. पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉड व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कुचकामी ठरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.