अमरावती : परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर परिवहन आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढल्याने लवकरच हेल्मेटसक्तीचे भूत अमरावतीकरांच्या मानगुटीवर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी पुणे आणि औरंगाबादेत होत असताना राज्याच्या परिवहन आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून हेल्मेटसक्तीच्या निर्णयावर प्रशासकीय शिक्कामोर्तब केले आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि जिल्हा तथा शहर आयुक्तालयातील पोलीस प्रशासनाला यावर लवकरच नियोजनात्मक निर्णय घेणे अभिप्रेत आहे.हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी नागरिकांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पुरेसा अवधी दिल्यानंतरच निश्चित तारखेपासून शहर तथा जिल्ह्यात दुचाकीस्वार व मागे बसणाऱ्यांना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे आरटीओमधील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)अंमलबजावणीच्या नियोजनची लगीनघाई : परिवहन आयुक्तांचे निर्देशउपलब्धतेचे नियोजनजनजागृतीसोबतच हेल्मेटच्या उपलब्धतेवरही सूक्ष्म मंथन अपेक्षित आहे. हेल्मेट अनिवार्य केल्यास जिल्ह्यातील नोंदणीकृत ४.८० लाख दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्याकरीता एकूण ९.६० लाख हेल्मेट अमरावतीकरांसाठी लागणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठलीही कंपनी एकाच वेळी हेल्मेट पुरवू शकत नाही, या अनुषंगाने सुध्दा सूक्ष्म नियोजन होणार असल्याची माहिती आहे. अन्यथा पुणे-औरंगाबादप्रमाणे अन्य शहरातही हेल्मेटबाबत जनक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, यांची संबंधित यंत्रणेला जाणीव आहे...म्हणून हेल्मेट अनिवार्यवाहन अपघातात दुचाकी वाहन चालविणाऱ्या व्यक्तीने आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घातल्यास अपघाताची तीव्रता कमी होते. ही वस्तुस्थिती परिवहन आयुक्तांनी नमुद केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याविषयी दिलेल्या आदेशांचे पालन होण्याच्या दृष्टिकोनातून व हेल्मेट परिधान न केल्यास होणारी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दुचाकी वाहन चालकांनी आणि मागे बसलेल्या व्यक्तींनी वाहन चालविताना हेल्मेट परिधान करावे, अशा सूचना परिवहन आयुक्तांनी केल्या आहेत. वाहन कंपनीच पुरविणार दोन हेल्मेटन्यायालयाच्या आदेशाची पूर्तता होण्याच्या दृष्टीकोनातून आता दुचाकी वाहन उत्पादकांमार्फत राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वाहन नोंदणी प्राधिकाऱ्याने त्यांचेकडे सादर केलेल्या वाहनांच्या कागदपत्रासोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याची खात्री करावी व त्यानंतर वाहनांची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हेल्मेटसाठी हमीपत्र अन्यथा परवाना नाहीहेल्मेट वापरण्यासंबंधी हमीपत्र लिहून देणाऱ्यास यापुढे वाहन शिकाऊ परवाना मिळणार आहे. हेल्मेटच्या वापराविषयी बंधपत्र देऊनच संबंधित दुचाकी चालकास शिकाऊ परवाना दिला जात आहे.
अमरावतीकरांच्या मानगुटीवर हेल्मेटचे भूत!
By admin | Updated: February 8, 2016 00:11 IST