शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:51 IST

अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यात ५३६३ कार्यकर्ते राहतील. तसेच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : सरसंघचालक मोहन भागवत, ५३६३ कार्यकर्ते राहणार उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलानजीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रवासी कार्यकर्ता शिबिर १८ ते २० जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यात ५३६३ कार्यकर्ते राहतील. तसेच पूर्ण वेळ शिबिरस्थळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.प्रवासी कार्यकर्ता शिबिरासाठी २७ एकरांच्या जागेत भव्य अंबानगरी उभारण्यात आली. या नगरीत पाच उपनगरे राहणार आहेत. रिद्धपूर, ऋणमोचन, कौंडण्यपूर, मुक्तागिरी व गुरूकुंज नगर असे नाव देण्यात आले आहेत. शिबिरात सहभागी होणाºया विदर्भातील ५,३६३ कार्यकर्त्यांची निवासाची व्यवस्था या उपनगरात राहणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येत छोटे तंबू उभारण्यात आले आहेत. शिबिरस्थानी साकारत असलेल्या अंबानगरीचे प्रवेशद्वार अमरावती शहरातल्या ऐतिहासिक अंबागेटच्या प्रतिकृतीचे राहणार असून, सोबतच परकोटासमान भिंतही राहणार आहे. या संपूर्ण शिबिराची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगराकडे आहे. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समाजातील विविध स्तरातील ३० मान्यवरांची स्वागत समिती तयार करण्यात आली आहे. तसेच १७ जानेवारीला संघ कार्यातील विविध प्रकल्पांची माहिती व क्षणचित्रांचे प्रदर्शन होईल, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. यावेळी उद्योगपती संजय जाधव, प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार, शिबिर महाव्यवस्था प्रमुख शैलेश पोतदार, प्रचार प्रमुख अनिल सामरे, सुजय पवार हे उपस्थित होते.भागवत पूर्णवेळ उपस्थित राहणारराष्ट्रीय प्रवासी शिबिराला प्रांत सरसंघचालक शिबिर स्थळीवरच पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सह. सरकार्यवाह भागय्याजी, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे अन्य क्षेत्रीय अधिकारी उपस्थित राहणार असून व शिबिराला उपस्थित कार्यकर्त्यांना दिशाबोध करणार आहेत. सरसंघचालकांचे शहरात इतरत्र कुठेही कार्यक्रम नियजित नसल्याचे ते कार्यक्रम स्थळीच पूर्णवेळ राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.