शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अमरावती : विजेअभावी इर्विनचा फिजिओथेरपी विभाग बंद

By उज्वल भालेकर | Updated: May 13, 2023 20:00 IST

रुग्णांना नाहक त्रास, दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या चकरा

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाचा त्रास हा रुग्णांना सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये मागील दोन दिवसांपासून वीज नसल्याने रुग्णांना रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. शनिवारी दुपारी एक वाजल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, तोपर्यंत अनेक रुग्णांना फिजिओथेरपी शिवायच परतावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हाडांचा आजार असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचे उपचार म्हणून अनेक डॉक्टर औषधांबरोबरच फिजिओथेरपी उपचाराचा सल्ला देतात. जिल्हा सामान्य रुग्णालय येथील फिजिओथेरपी विभागातही रोज सरासरी १५ ते २० रुग्ण हे फिजिओथेरपीसाठी येतात. परंतु, मागील दोन दिवसांपासून रुग्णालयातील अस्थीरोग, बाह्यरुग्ण विभाग तसेच फिजिओथेरपी येथील वीज पुरवठा खंडित असल्याने विजेवर चालणारी फिजिओथेरपी मशिन बंद आहे. त्यामुळे रुग्णांना दोन दिवसांपासून चकरा माराव्या लागत आहेत. प्राप्त माहितीनुसार गुरुवारपासून या विभागातील वीज नाही. त्यामुळे या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली. परंतु, दोन दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने शनिवारीदेखील अनेक रुग्णांना फिजिओथेरपीशिवायच परतावे लागले.फिजिओथेरपी विभागातील वीज पुरवठा खंडित असल्याची माहिती गुरुवारीच संबंधित विभागाला दिली होती. शनिवारी दुपारपासून विद्युत पुरवठा सुरळीत झाला असून, फिजिओथेरपी सुरू झाली आहे. डॉ. नरेंद्र सोळंके, आरएमओ, इर्विन

टॅग्स :Amravatiअमरावती