शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीत अमरावतीचा टक्का घसरला; अंतिम निकाल जाहीर

By जितेंद्र दखने | Updated: July 4, 2024 21:20 IST

ग्रामीणचे ६९६ शहरातील १७३ जण ठरले शिष्यवृत्तीधारक.

जितेंद्र दखने, अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा अमरावती जिल्ह्याचा टक्का घसरला आहे. शहर व ग्रामीणचे जिल्ह्यातील ८६९ जण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. पाचवी आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे परिणाम मात्र, त्या पद्धतीचे दिसत नसल्याने आता शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्ह्यात पाचवीचे १८.०५ टक्के तर आठवीचे अवघे ८.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ८६९ एवढी शिष्यवृत्तीधारक ठरलेल्यांची संख्या आहे.

जिल्हाभरातील विविध शाळांमधील १० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी पाचवीची तर ९ हजार २९३ विद्यार्थ्यांनी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे, यामध्ये निकाल पाहून सुमार कामगिरी झाल्याचा प्रत्यय प्रकर्षाने दिसून येतो. पाचवीचे १० हजार ३९९ पैकी परीक्षार्थीपैकी १८७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात केवळ ५१० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या निकालाची टक्केवारी १८.०५ एवढीच आहे. तर आठवीचे ९ हजार २९३ पैकी केवळ ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३५९ जणच शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. असे दोन्ही मिळून केवळ ८६९ शिष्यवृत्तीधारकांची संख्या आहे. विशेष म्हणजे १५ तालुक्यांचा निकाल पाहिला तर पाचवी व आठवीचा निकाल हा केवळ १० ते ३० टक्क्याच्यां आताच लागला आहे. काही तालुक्याचा निकाल तर पाच टक्केही लागला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालात जिल्हा मागे पडल्याने या सुधारणा व्हावी यादृष्टीकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा असाच परफॉर्मन्स पुढील वर्षी दिसला तर यात आश्चर्य वाटू नये, हे विशेष.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून भातकुली पंचायत समिती तज्ज्ञाच्या माध्यमातून अतिरिक्त वर्ग घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी परीक्षा घेतली होती. त्यामुळे या पंचायत समितीचा यंदा निकाल चांगला लागला आहे. मात्र इतर तालुक्यात मागे असले तरी पुढील वर्षी भातकुली सारखा पॅटर्न सर्व तालुक्यात राबवून निकालाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयन्न करू. बुद्धभूषण सोनवने, शिक्षणाधिकारी प्राथमिक.

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती