शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्याच्या दरोडा प्रकरणात तिघे जेरबंद; जालन्यातून ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 13:36 IST

परतवाड्यातील ईश्वरलाल पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समधील दरोडाप्रकरणी जालन्यातून तिघांना अमरावती एलसीबीने अटक केली आहे.

अमरावती - परतवाड्यातील ईश्वरलाल पन्नालाल अग्रवाल ज्वेलर्समधील दरोडाप्रकरणी जालन्यातून तिघांना अमरावती एलसीबीने अटक केली आहे. २७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींजवळून मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.परतवाड्याच्या दरोड्यात दरोडेखोरांनी ७८ लाखांचे सुवर्णालंकार चोरल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात या दरोड्याचा पर्दाफाश करण्यासाठी पथके कार्यान्वित केली होती.शिकलकरी समाजाची टोळी या चोरीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी विजयसिंग कृष्णासिंग भादा (३५), संजूसिंग कृष्णासिंग भादा (२४) तसेच सुंदरसिंह सुकलालसिंह राजपूत (३०) यांना ताब्यात घेतले. सुंदरचा बाप परतवाडा यथे लालपुलाजवळ राहतो. त्यांनी त्याच्याकडे येऊन एक दिवस आधी रेकी केली. दरोड्यानंतर रात्री ३ वाजता इंडिका कारने ते अमरावती येथे इतवाऱ्यातील केजीएन ट्रेडर्सजवळ आले. तेथे त्यांचे वाहन नादुरुस्त झाल्याने ती कार त्यांनी तेथेच सोडली. तेथून १०० मीटर पायी चालत गेले.एका आॅटोरिक्षाला थांबवून अमरावती बस स्थानकात सोडून मागितले. सकाळी ५.३० च्या एसटीने जालन्याला निघाले. अमरावती एलसीबीने सीसीटीव्हीवरून आॅटोरिक्षाचा शोध घेतला. त्याच्याकडून माहिती काढून पोलिसांनी जालना गाठले. तेथील लोधीपुरा भागातील गुरू गोविंदसिंगनगर भागातून त्यांना पहाटे ५ वाजता ताब्यात घेण्यात आले. सकाळी ९.३० वाजता पोलीस पथक या दरोडेखोरांना घेऊन अमरावतीत आले. या टोळीने चांदूर बाजार येथेही दरोडा घातल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे.