शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: सुपरच्या ४१ शस्त्रक्रियांत २६ मातांची काळजाच्या तुकड्याला किडनी दान

By उज्वल भालेकर | Updated: June 29, 2024 19:31 IST

Amravati News: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भाकारी, ही म्हण सत्यात उतरविणाऱ्या अनेक उदाहारणे आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे आतापर्यंत पार पडलेल्या ४१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये २६ मातांनी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी किडनी दान केली आहे.

- उज्वल भालेकर अमरावती - स्वामी तिन्ही जगाचा आईविना भाकारी, ही म्हण सत्यात उतरविणाऱ्या अनेक उदाहारणे आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे आतापर्यंत पार पडलेल्या ४१ किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये २६ मातांनी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी किडनी दान केली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या किडनी प्रत्यारोपणासाठीही आपल्या २६ वर्षीय मुलासाठी ४४ वर्षीय आईने किडनी दान केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील रहिवासी असलेला सचिन विनोद ओझा (२६) हा मागील ५ महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्यावर डायलेसिस उपचार सुरू होते. परंतु दर महिन्याला करावे लागणारे डायलेसिस यामध्ये होणारा त्रास लक्षात घेता आई अनुपम विनोद ओझा (४४) यांनी आपल्या मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथे ४१ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. रुग्णालयातील ही २६ वी माता होती जिने आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी किडनी देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी रुग्णालय प्रशासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत केली. सुपरचे एमएस डॉ. अमोल नरोटे, ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. प्रणित काकडे, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. प्रतीक चिरडे, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रोहित हातगावकर, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ. दीपाली देशमुख, डॉ. जफर अब्बास अली, आरएमओ डॉ. माधव ढोपरे, किडनी ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर डॉ. सोनाली चौधरी, यांनी यशस्वी केली. यावेळी परिचारिका अनिता तायडे, सरला राऊत, कविता बेरड, नीलिमा तायडे, लता मोहता, अभिषेक नीचत, स्नेहल काळे, कीर्ती तायडे, तेजल बोंडगे, अल्याझा तेलगोटे, नम्रता दामले, अनिता खोब्रागडे, योगिश्री पडोळे, रेखा विश्वकर्मा तसेच अभिजित देवधर, वैभव भुरे, अनु वडे, नितीन मते यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर आई आणि मुलगा दोघांच्याही प्रकृतीमध्ये सुधारणा येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :AmravatiअमरावतीOrgan donationअवयव दान