शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर 

By जितेंद्र दखने | Updated: March 18, 2024 23:41 IST

Amravati News: नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे.

- जितेंद्र दखणे  अमरावती - नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी २४ हजार ६५२ परीक्षार्थ्यांपैकी १६ हजार ८७५ महिला व ७ हजार ७७७ पुरुष परीक्षार्थ्यांनी परीक्षेला हजेरी नोंदवित पेपर सोडविला आहे. विशेष म्हणजे नव्वद वर्षीय आजीबाईने दिला पेपर मात्र ७ हजार ४५ जण परीक्षेला गैरहजर होते. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारने शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कधीही परीक्षा केंद्रांवर या अन् परीक्षा द्या, अशी सवलत देण्यात आली होती. त्यामुळे विविध गावांतील नोंदणीकृत निरक्षर सकाळीच शेती कामासाठी गेले. अन् दुपारी जेवण आटोपून परीक्षा केंद्रांवर हजेरी नोंदवित परीक्षा दिली नव्वद वर्षीय लिलाबाईनी सोडविला पेपरनव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पार पडलेल्या चापणीत परीक्षेत मोर्शी तालुक्यातील शिरखेड केंद्रातंर्गत येणाऱ्या सावरखेड या केंद्रावर लिलाबाई गाेरखनाथ हिरडे या नव्वद वर्षीय आजीबाईनी पेपर सोडविला.या आजीबाईचे केंद्रप्रमुख अब्दुल राजिक हुसेन यांनी पुष्पगुच्छ देवून गौरव केला. पुरुषांपेक्षा महिला उत्साहीनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह १५ तालुक्यांत १७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीला उल्लास ॲपवरील नोंदणी केलेल्या ३१६९७ पैकी २४ हजार ६५२ निरक्षरांमध्ये सर्वाधिक १६ हजार ८७५ महिलांनी परीक्षेला हजेरीला लावली होती. तर ७ हजार ७७७ पुरुष मात्र परीक्षेत सहभाग नोंदविला. त्यामुळे या परीक्षेत महिलांचा सहभाग अन् उत्साह अधिक असल्याचे दिसून आले. ‘उल्लास ॲप’वर अशी आहे नोंदणीएकूण नोंदणी ३१६९७महिला-२१२५०पुरुष-१०४४७ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘उल्लास ॲप’वर सुमारे ३१ हजार ६९७ जणांची नोंदणी झाली आहे. यापैकी २४ हजार ६५२ जणांनी १६०३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली आहे. मात्र, ७ हजार ४२ परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर होते.-सय्यद राजीक, शिक्षणाधिकारी, योजना

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा