शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ९१ कर्मचारी लेटलतिफ; सीईओंची सरप्राईज व्हिजीट

By जितेंद्र दखने | Updated: March 21, 2023 19:53 IST

विभागप्रमुखांवर सोपविली कारवाईची जबाबदारी; संपानंतरच परतताच कारवाईचा बडगा.

अमरावती: जिल्हा परिषदेतील कर्मचारी सलग सात दिवसांच्या संपानंतर मंगळवारी कामावर परतले आहेत. अशातच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुख्यालयातील विविध विभागांत आकस्मिक भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीची पाहणी केली. यावेळी सीईओंना ९१ अधिकारी व कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे या गैरहजर कर्मचाऱ्यांवर विभागप्रमुखांनी कारवाई करण्याचे निर्देश सीईओ पंडा यांनी दिले आहेत.

शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी निश्चित केलेली आहे.अशातच सीईओंनी अचानक विविध विभागांत प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना ९१ कर्मचारी कार्यालयीन वेळेवर हजर नसल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे खातेप्रमुख म्हणून आपण कार्यालयीन वेळेमध्ये उपस्थित राहून आपल्या अधिनस्त कर्मचारी कार्यालयीन वेळेवर उपस्थित राहण्याकरीता दैनंदिनरित्या त्यांचे हजेरी रजिस्टरची तपासणी करणे ही आपल्या जबाबदारी आहे.याबाबत आपणास वेळोवेळी यापूर्वी निदर्शनास आणून दिले आहे. असे असताना विविध विभागांत सीईओंनी प्रत्यक्ष भेटी दिली असता गैरहजर कर्मचारी संख्या लक्षात घेता.गैरहजर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेवर हजर नसल्याने ही बाब प्रशासकीयदृष्ट्या गंभीर आहे.त्यामुळे आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश या लेखी आदेशात सीईओ अविश्यांत पंडा यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.विभागनिहाय गैरहजर कर्मचारीआराेग्य १०, शिक्षण विभाग माध्यमिक,०२,प्राथमिक ०५, भातकुली पाणीपुरवठा ०१, नरेगा ०३, वित्त विभाग २४,पा.व.स्व ०७,सिंचन ०३, बांधकाम ०३,बांधकाम उपविभाग क्र.०५,उपविभाग क्र.२ मध्ये ०३, महिला व बालकल्याण ०१, समाजकल्याण ०२, कृषी ०२, पंचायत ०२, टीएमओ अमरावती ०७, सामान्य प्रशासन विभाग ०३ असे ९१ कर्मचारी गैरहजर होते.

टॅग्स :Amravatiअमरावती