शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: ‘ईर्विन’ रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात, ५ एप्रिलपासून सीएस कार्यालयाच्या शिफ्टिंगला होणार सुरुवात 

By उज्वल भालेकर | Updated: March 21, 2024 21:43 IST

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- उज्वल भालेकरअमरावती  - जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे येथील सीएस कार्यालय हे याच रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. ५ एप्रिलपासून या शिफ्टिंगलाही सुरुवात होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी फरिदाबाद येथील जागा निश्चित झाली असली, तरी या ठिकाणी महाविद्यालय आणि त्याला संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयाची इमारत बांधकामाला लागणारा वेळ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच शहरातील इतर शासकीय रुग्णालयांच्या इमारतीमध्ये ७ वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या निर्णयानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय; तसेच आवश्यक इतर शासकीय रुग्णालयांची जागा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सात वर्षांच्या करारावर आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. तर काही दिवसांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या पदनिर्मितीला देखील मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय होणार आहे.

त्यामुळे या ठिकाणी काही प्रमाणात होणाऱ्या बदलासाठी आवश्यक निधीही प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील सीएस कार्यालय हे रुग्णालयाच्या मागील बाजूस म्हणजेच गजानन महाराज मंदिराजवळ असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिफ्ट होणार आहे. या ठिकाणी यापूर्वी केमोथेरेपी युनिट सुरू होते. ते विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे शिफ्ट झाले आहे. त्यामुळे खाली झालेल्या या इमारतीमध्ये ५ एप्रिलपासून सीएस कार्यालयाचे शिफ्टिंग सुरू होईल.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी रुग्णालयाची इमारत ७ वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये कराव्या लागणार आहेत. त्यामुळे सीएस कार्यालय हे गजानन महाराज मंदिराजवळीत मंदिरात शिफ्ट होणार असून, ५ एप्रिलपासून त्याला सुरुवात होईल.डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती