शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अमरावती, हैदराबाद कर्नाळा संघाने राखले वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 22:51 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महापालिका यांच्यावतीने आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखत अमरावती, हैदराबाद , कर्नाळा, नागपूर संघांनी पहिल्या व दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम ठेवले.रुक्मिणीनगरातील नेताजी सामाजिक विकास संस्थेच्या प्रांगणावर सदर सामने पाहण्यासाठी शनिवारी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.उदघाटनीय दिवसाचा शुक्रवारी पुरुष ...

ठळक मुद्देअखिल भारतीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा : आज जेतेपदासाठी चढाओढ

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महापालिका यांच्यावतीने आयोजित महापौर चषक कबड्डी स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखत अमरावती, हैदराबाद , कर्नाळा, नागपूर संघांनी पहिल्या व दुसऱ्या दिवशीही आपले वर्चस्व कायम ठेवले.रुक्मिणीनगरातील नेताजी सामाजिक विकास संस्थेच्या प्रांगणावर सदर सामने पाहण्यासाठी शनिवारी क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती.उदघाटनीय दिवसाचा शुक्रवारी पुरुष गटातील पहिला सामना नवशक्ती संघ हैद्राबाद (३८) व जागृती अमरावती (२१) संघात रंगला. हैद्राबादने हा सामना आपल्या पारड्यात पाडला. छत्रपती संघ अमरावती (४१) व नवमहाराष्ट्र संघ मुंबईमध्ये (१२) यांच्यातील सामना एकतर्फी ठरला.महिला गटातील पहिला सामना रायगडचा कर्नाळा स्पोर्ट्स (३३) व खामगावचा शिवाजी संघ (२२) यांच्यात रंगतदार ठरला. अमरावतीच्या जागृती (१६) ला मुंबईच्या संघर्ष संघ (६२) ने चित केले.शनिवारी सकाळपासून सामन्यांना सुरूवात झाली. यामध्ये हनुमान मंडळ केळीवेळी, (३४) व श्रीकृष्ण क्रीडा मंडळ जावरा (२४), नवराष्ट्र मुंबई (२५) व सी.ए.डी. पुलगाव (३५), बजरंग अमरावती (२१) व शिवाजी खामगाव (३७), समर्थ अमरावती (३५) व जगदंबा अकोला (१८), छत्रपती अमरावती (४०) व गाडगेबाबा अमरावती (२६) असे सामने झाले.जागृती अमरावती (२५) व सुभाष वाडगाव (२२) तसेच ओम अमर नागपूर (२७) व साईनगर गुजरात (२३) यांच्यात निसटत्या फरकाने हार-जीत ठरली. युवक क्रीडा मंडळ अमरावती (५०) व युवा नवरंग अमरावती (४४) यांच्यात अटीतटीचा सामना झाला. आझाद मंडळ अमरावती (४७) ने शिवाजी खामगाव (३४) ला धूळ चारली. नवशक्ती हैद्राबाद (३२) ने श्रीकृष्ण क्रीडा मंडळ जावरा (०८) ला धूळ चारली.स्वागताध्यक्ष म्हणून नितीन देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सामन्यांवर लक्ष ठेवून होते. खा. आनंदराव अडसूळ, आमदार रमेश बुंदिले, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, गजानन पुंडकर, माजी आमदार सुलभा खोडके, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय खोडके, नगरसेवक विलास इंगोले, प्रशांत वानखडे, अमरावती बाजार समिती सभापती प्रफुल्ल राऊत, चांदूरबाजारचे सभापती प्रवीण वाघमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढोमणे, शिक्षण सभापती जयंतराव देशमुख, यांनी सदिच्छ भेटी दिल्या. २५ पंच सामन्यांत पंचगिरी करीत असून, पद्माकर देशमुख, सतीश डफळे, महावीर ठाणवी निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.