शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती वनक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 12:14 IST

चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नर बिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

ठळक मुद्देउशिरा पंचनामा चिरोडी जंगलात नैसर्गिक मृत्यूचा अंदाज

अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमतपोहरा : चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात एक चार वर्षीय नरबिबट रविवारी सायंकाळी ५ वाजता मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. उशिरा रात्रीपर्यंत मृत बिबट्याचा पंचनामा सरूच होता.चिरोडी जंगलात येणाऱ्या पश्चिम चिरोडी वनबीट वनखंड क्रमांक ४० मध्ये वनकर्मचारी गस्तीवर असताना त्यांना सुमारे पाच वर्षीय बिबट मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती वन कर्मचाऱ्यांनी चांदूररेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे यांना दिली. त्यानंतर घटनास्थळी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर दाखल झाले. बिबट्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा, मार नसल्याने त्याचा मृत्यू कशामुळे झाला असावा, याबाबत वनाधिकारीदेखील अंदाज वर्तवू शकले नाहीत. त्यामुळे एसीएफ कविटकर यांनी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचे विच्छेदन करण्याबाबतचे कळविले. मात्र, पशू वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने सोमवारी ३० आॅक्टोबर रोजी बिबट्याचे विच्छेदन होणार आहे. त्यामुळे बिबट कशामुळे दगावला, हे सोमवारी समजू शकेल, असे कविटकर यांनी सांगितले. दरम्यान पोहऱ्याचे वनपाल विनोद कोहळे, चिरोडीचे वनपाल सुधाकर निर्मळ यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृत्यू घातपाताने तर झाला नसावा? याबाबत बिबट्याचे शरीर तपासून शंका उपस्थित केल्यात. मात्र, मृत बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला असावा, असे गृहीत धरले. त्यानंतर सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी मृत बिबट्याचा पंचनामा करण्यात आला. यावेळी वनरक्षक सुनील येरवाड, एस.एम. कथलकर, सतिश नाईक, राजेश खडसे, प्रभाकर शेंडे, शेख रफिक, शालिक पवार, चव्हाण, मंगल यादव उपस्थित होते. बिबट्यावर सोमवारी चिरोडी जंगलात घटनास्थळीच विच्छेदन केले जाणार आहे.घटनास्थळी आढळले सायाळचे काटेचिरोडी जंगलात नाल्याच्या कपारीत मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या शेजारी सायाळचे काटेदेखील आढळले आहेत. तसेच बिबट्याच्या तोंडावर दर्शनी भागात नाकाशेजारी खरचटल्याचे दिसून आले. त्यामुळे सायाळचे काटे बिबट्याला रुतले असावे, असा अंदाज बांधला जात आहे.