वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला. मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याचा जितका आनंद आशिषला आहे, तितक्याच वेदना मृत पावलेल्या लोकांसाठी आशिष व्यक्त करीत होता. व्हीएमव्ही कॉलेजमागील गणेशपेठ येथील रहिवासी असलेला आशिष हरिद्वार बोके २२ एप्रिल २०१५ रोजी सॅप नृट्रियन्स कंपनीतर्फे विदर्भातील ६३ कृषी केंंद्र संचालकांसोबत काठमांडू आणि पोखरा येथे सहलीला गेले होते. शनिवारी सर्व जण काठमांडू पासून ७० किलोमिटर दूर असणाऱ्या मनोकामना मंदिर परिसरात निसर्गाचा आनंद घेत होते. दरम्यान ११.४६ वाजताच्या सुमारास ९० सेंकदाचा भुकंपाच्या धक्क्याने सर्वानाचा हादरून टाकले. काय होत आहे, कसे होत आहे. हे समजण्याचा पहिला अनुभव घेत सर्वांनीच पळापळ सुरु केली होती. सुरक्षित जागेवर सर्व जण पोहचल्यावर आजूबाजूला भयावह परिस्थीती त्यांच्या नजरेस पडली. भुकंपामुळे पहाडावरील रोप वे वरील केबल कार अचानक खाली कोसळली व पहाडावरून भुसखलन झाल्याने तब्बल ४० जण त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूमुखी पडले. हे दृष्य आशिषसोबतच्या सर्व पर्यटकांनी अनुभवले. भुकंपाचे धक्के पाहून कंपनीचा वाहनचालक वाहने सोडून सुरक्षीत ठिकाणी पळाला. काही क्षणातच भुकंपाचे धक्के बंद झाल्यावर तेथील सर्व दृष्य भयानक दिसू लागले होते. त्या परिसरातील हॉटेल व काही इमारती कोसळल्याने सर्वत्र आरडोओरड सुरू झाल्याने आशिषला दिसले. तेथून जाण्याचा पर्याय निवडुन तत्काळ सर्व पर्यटकांसह आशिषनेही काठमांडू जाण्याचे ठरविले.
अमरावतीच्या आशिषने अनुभवले नेपाळमधील मृत्यूचे तांडव
By admin | Updated: April 29, 2015 00:12 IST