शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील तीन हजार गावांमध्ये आॅनलाइन सातबारा, विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:12 IST

अचूक संगणकीकृत सातबारा आणि ८ ‘अ’ साठी तलाठी, मंडळ अधिका-यांनी चावडी वाचनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरूवार २४ आॅगस्टपर्यंत अमरावती विभागातील ७ हजार ४६५ गावांपैकी ३ हजार ०८७ गावांमध्ये सातबारा प्रक्रिया आॅनलाइन झाली असून लवकरच इतरही गावांमध्ये हा बदल घडून येणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.

- जितेंद्र दखनेअमरावती, दि. 28 -  अचूक संगणकीकृत सातबारा आणि ८ ‘अ’ साठी तलाठी, मंडळ अधिका-यांनी चावडी वाचनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरूवार २४ आॅगस्टपर्यंत अमरावती विभागातील ७ हजार ४६५ गावांपैकी ३ हजार ०८७ गावांमध्ये सातबारा प्रक्रिया आॅनलाइन झाली असून लवकरच इतरही गावांमध्ये हा बदल घडून येणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.राज्यात सन २००२ पासून सातबारा संगणकीकृत करण्यात आले असून त्यात चुका आढळून येत होत्या. तसेच नोंदी आॅनलाइन करण्यासाठी केंद्रपुरस्कृत ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन’ प्रोेगाम  कार्यान्वित  करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफार प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे राज्यात ई-फेरफार केले जात आहेत. राज्यभरातील संबंधित महसूल यंत्रणेद्वारे सातबाराचे सर्व्हे नंबर योग्यप्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सातबारा आणि आठ ‘अ’ साठी तब्बल २४ मुद्यांवर तपासणी केली जात आहे. अमरावती विभागात ५६ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ७ हजार ४६५ महसुली गावे आहेत. त्यामधून आतापर्यंत ३ हजार ०८७ गावांमध्ये चावडी वाचन करण्यात आले आहे.

अमरावती विभागातील जिल्हानिहाय गावे...अमरावती     - ६६५बुलडाणा    - ३५१यवतमाळ    - ५३७अकोला    - ९२७वाशिम        - ६०७