शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण पंधरवड्यात अमरावती जिल्हा महाराष्ट्रात दुसरा

By जितेंद्र दखने | Updated: April 12, 2023 20:24 IST

१५ मार्च ते ३ एप्रिल : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जनजागृती

अमरावती : बालकांना योग्य पोषण आहार मिळावा आणि त्यांची योग्य काळजी घेतली जावी, पालकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी १५ मार्च ते ३ एप्रिल या काळात सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. यानिमित्त अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांचे वजन घेणे, आहाराचे महत्त्व समजून सांगणे, गरोदर मातांची काळजी घेणे, स्तनपानाचे महत्त्व समजावून सांगणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात येते. पोषण पंधरवाडयात राज्यात जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा  द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

दरवर्षी मार्च महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात  पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो. बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना योग्य आहार आणि त्यांचे योग्य पोषण होईल यादृष्टीने विविध बाबी संगण्यात येतात. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. कमी वजनाच्या बालकांसाठी उपाययोजना करण्यात येतात. बालकांना आनंददायी असे पूर्वप्राथमिक आरोग्य शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे, अंगणवाडी केंद्रातील विविध योजनांची लाभार्थ्याना माहिती देणे असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात यंदाही पोषण पंधरवाडयाचे अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाने  सूक्ष्म नियोजन करून जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांतून विविध कार्यक्रम राबविले होते.

या उपक्रमातील कार्यक्रमाची केंद्र शासनाच्या वेबसाइटवर नोंदणीसुद्धा केली होती. यावर्षी पुणे जिल्हा हा राज्यात प्रथम, अमरावती द्वितीय, तर अहमदनगर जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. महिला बालविकास विभागाने  पोषण पंधरवाडयात उत्तम कामगिरी केली आहे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या नेतृत्वात सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळवून दिला आहे.विभागाने पोषण पंधरवड्यानिमित्त अंगणवाडी केंद्रात नियोजनबद्धरीत्या विविध कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी उत्तम कामगिरी केल्यामुळे जिल्ह्याला राज्यातून द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला याबद्दल सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.डॉ. कैलास घोडके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती