शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती नवव्या क्रमांकावर, संगणक विभागाचे यश  

By प्रदीप भाकरे | Updated: February 3, 2023 19:35 IST

‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये अमरावती जिल्हा नवव्या क्रमांकावर आला आहे. 

अमरावती: सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काढण्यात आलेल्या राज्यातील २७ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात अमरावती महापालिकेने नववा क्रमांक पटकावला आहे. महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप आणि समाज माध्यमांतील खात्यांवरील माहितीवर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. 'पॉलिसी रिसर्च ऑर्गनायजेशन’ या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. उपलब्धता, सेवा आणि समाज माध्यम वापर अशा स्वतंत्र निकषांवर अमरावती महापालिकेने चांगली कामगिरी आहे.

प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान व्हावे याकरिता अमरावती महानगरपालिका नेहमी अग्रेषित राहिली आहे. त्याच कल्पनेतून कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याकरिता महापालिकेमार्फत मालमत्ता कर ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली. तसेच महापालिकेच नवीन संकेतस्थळ तसेच माय अमरावती मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले. समाजमाध्यमांमार्फत महापालिकेच्या विविध योजनांची माहिती प्रकाशित करण्यात आली. ‘सिटी ई गव्हर्नन्स इंडेक्स’मध्ये सहज उपलब्धता, सेवा आणि पारदर्शकता या तीन प्रमुख निकषांनुसार सर्वेक्षण करण्यात आले.  

असे पूर्ण केले निकषसहज उपलब्धता या निकषानुसार संकेतस्थळ तसेच माय अमरावती मोबाईल ॲपद्वारे सेवा आणि माहिती नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्यात आली. तर, सेवा या निकषांतर्गत संकेतस्थळ व मोबाईल ॲपमार्फत विविध सेवा या आरटीएस पोर्टल मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या. तर प्रशासकीय व्यवहारामध्ये पारदर्शकता यावी, याकरिता महापालिकेच्या विविध योजनांची माहिती समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली. आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सिस्टीम मॅनेजर, अमित डेंगरे व संगणक विभागाने त्यासाठी प्रयत्न केले.   सेवा, पारदर्शकता आणि उपलब्धता या तीन निकषांवर काढण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स निर्देशांकात महापालिकेने नववा क्रमांक पटकावला. अमरावतीकरांना कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जलद सेवा प्रदान करण्यासाठी महानगरपालिका नेहमी कटिबद्ध राहिली आहे. - डॉ. प्रवीण आष्टीकर, महापालिका आयुक्त  

टॅग्स :Amravatiअमरावती