शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील बाधित खरिपाची नजरअंदाज पैसेवारी फक्त ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:28 IST

यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद उद्ध्वस्त ‘महसूल’च्या नजरेत आलबेलशेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम बाधित झाला. यामध्ये अल्प कालावधीची सोयाबीन, मूग व उडीद ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यानंतर ऑगस्टअखेर सुरू झालेल्या पावसाने अद्यापही खंड दिलेला नाही. एकंदर यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पाऊस लेटलतीफ राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीची मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यापासून आलेल्या पावसाने जिल्ह्यात सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. त्यामुळे मोड आलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पावसाअभावी सोयाबीनची वाढदेखील खुंटली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आलबेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जिल्ह्यातील १,९६४ गावांसाठी नजरअंदाज पैसेवारी ही ६९ पैसे जाहीर केली. सर्वात कमी पाऊस असलेल्या भातकुली तालुक्यात ६८ पैसेवारी असल्याने महसूल विभागाला सर्व काही हिरवेच दिसते काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमरावती तालुक्यात ६६, तिवसा ७० चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ७१, नांदगाव खंडेश्वर ६६, मोर्शी ७३, वरूड ७१, अचलपूर ७०, चांदूरबाजार ६४, दर्यापूर ६७, अंजनगाव सुर्जी ७६, धारणी ६६ व चिखलदरा तालुक्यात ६४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुधारित व नंतर अंतिम पैसेवारी’ सुधारणेला वाव असला तरी नजरअंदाजमध्ये दाखविलेले जास्त उत्पन्न नंतरच्या पैसेवारीला बाधित करते, ही वस्तुस्थिती नजरअंदाज करता येणार नाही.

भातकुली तालुक्यातील पीकस्थिती नजरेआडजिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या ७० टक्केच पाऊस सद्यस्थितीत झालेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पावसाच्या जून व जुलै महिन्यात या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नव्हता. मात्र, जाहीर झालेली नजर अंदाज पैसेवारी ही ६८ पैसे असल्याने दुष्काळाच्या सुविधा या तालुक्यापासून हिरावण्यात आले आहे. कृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात शेतकºयांवर अन्याय होत असताना प्रशासनाला खडे बोल सुनावण्याचे भान या निवडणुकांच्या काळात शासनाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती