शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द

By प्रदीप भाकरे | Updated: March 23, 2023 18:06 IST

उच्च न्यायालय : मुद्दा २९ कोटींच्या कंत्राटी मनुष्यबळाचा, चार आठवड्यात पात्र निविदाधारकाला वर्कऑर्डर

अमरावती : महापालिका प्रशासनाने अमरावती नागरिक सहकारी संस्थेला दिलेली मनुष्यबळ पुरविण्याची वर्कऑर्डर उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. पुढील चार आठवड्यात महापालिकेने फायनान्सियल बिडचे (आर्थिक लिफाफा) पुनर्मुल्यांकन करावे, तथा अटी शर्तींचे संपुर्णपणे पालन करून पात्र निविदाधारकाला ते कंत्राट वजा वर्कऑर्डर द्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने गुरूवारी महापालिका प्रशासनाने दिले. न्या. रोहित देव व वृषाली जोशी यांच्या दि्वसदस्यीय खंडपिठाने तो निर्णय दिला.

महापालिकेला तीन वर्ष ३५१ इतके कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याच्या सुमारे २९ कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया करण्यात आली. टेक्निकल व फायनान्सियल बिड पुर्ण झाल्यानंतर ते महाटेंडर अमरावती नागरिक सहकारी संस्थेला बहाल करण्यात आले. तत्कालिन उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्या स्वाक्षरीने ११ नोव्हेंबर २०२२ रोजी त्या संस्थेला वर्कऑर्डर देण्यात आली.

महापालिकेच्या त्या वर्कऑर्डरला फायनान्सियल बिडमध्ये पात्र ठरलेल्या जानकी नामक संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या संस्थेला कंत्राट देतेवेळी महापालिका प्रशासनाने अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचा मुख्य आक्षेप घेण्यात आला. ती दिलेली वर्कऑर्डर अटी शर्तींना डावलून देण्यात आल्याने ती रदद करावी, यासाठी जानकी संस्थेने न्यायालयील लढा दिला. ॲड. परवेज मिर्झा यांनी जानकी संस्थेकडून यशस्वी युक्तीवाद केला.महापालिकेने दिली चुकीची कबुली

महापालिकेच्या वतीने गुरूवारी लेखी म्हणणे मांडण्यात आले. त्यात महापालिकेने चुकीची कबुली देऊन १० बिडरचा समावेश असलेल्या फायनान्सियल बिडचे पुनर्मुल्यांकन करू, अशी भूमिका मांडली. नव्याने निविदा प्रक्रिया न करता आर्थिक लिफाफ्यातील अटी शर्तींचे संपुर्णपणे पालन करून पात्र निविदाधारकाला कंत्राट देण्याचे मान्य केले. त्यावर न्यायालयाने महापालिकेला त्या प्रक्रियेसाठी चार आठवडयांची मुदत दिली आहे.

न्यायालयीन आदेशाने यापुर्वी दिलेली वर्कऑर्डर रद्द झाली आहे. महापालिका प्रशासनाने निविदेच्या फायनान्सियल बिडचे पुनर्मुल्यांकन करावे, तथा चार आठवड्याच्या आत पात्र निविदाधारकाला ते काम द्यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- श्रीकांतसिंह चव्हान, विधी अधिकारी, मनपा, अमरावती

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयAmravatiअमरावती