शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती केंद्रातून ‘कु.सौ. कांबळे’ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:17 IST

शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या ५७ व्या महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अमरावती केंद्रस्तरीय प्राथमिक फेरीत अंबापेठ क्लब (अमरावती) च्या ‘कु.सौ. कांबळे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम पारितोषिक पटकावत अंतिम फेरी गाठली.

ठळक मुद्दे‘सत्यदास’ही अंतिम फेरीत : ५७ वी महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या ५७ व्या महाराष्टÑ राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अमरावती केंद्रस्तरीय प्राथमिक फेरीत अंबापेठ क्लब (अमरावती) च्या ‘कु.सौ. कांबळे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम पारितोषिक पटकावत अंतिम फेरी गाठली.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये नाट्यभारती (इंदूर) या संस्थेच्या ‘सत्यदास’ या नाट्यप्रयोगाने द्वितीय पारितोषिक मिळविले. त्यांचीही अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. वेल अ‍ॅन्ड वेल पब्लिक एज्युकेशन सोसायटी (इंदूर) ला ‘अचानक’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक विशाल तराळ (नाटक - कु.सौ. कांबळे), द्वितीय पारितोषिक श्रीराम जोग (सत्यदास), प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक अभिजित कळमकर (सत्यदास), द्वितीय पारितोषिक दीपक नांदगावकर (तीस तेरा), नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक प्रशांत देशपांडे (कु.सौ. कांबळे), द्वितीय पारितोषिक अनिरुद्ध किरकिरे (सत्यदास), रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक मंजूश्री भोगले (अचानक), द्वितीय पारितोषिक दीपाली दाते (सत्यदास), उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक श्रीकांत भोगले (अचानक) व रसिका वानखडे-वडवेकर (कु.सौ. कांबळे), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रतीक्षा बेलसरे (सत्यदास), प्रांजल डाखोडे (तीस तेरा), सागरिका मराठे (अचानक), पयोष्णी ठाकूर (तीस तेरा), मनोज पटेरिया (वाटा पळवाटा), विशाल तराळ (कु.सौ. कांबळे), अभिनय देशमुख (पैसा झाला खोटा), रावसाहेब काळे (लांबजाना) यांना पुरस्कृत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात १३ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. संजय गणपुले, अनघा घोडपकर आणि अरविंद लिमये यांनी परीक्षण केले.