शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: आठ संवर्गाच्या रिक्त जागांसाठी ४९१४ उमेदवार देणार परीक्षा, जिल्हा परिषदेने दिली माहिती

By जितेंद्र दखने | Updated: October 6, 2023 19:29 IST

Amravati: अमरावती जिल्हा परिषदेत विविध संवर्गात रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

- जितेंद्र दखने अमरावती  - जिल्हा परिषदेत विविध संवर्गात रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यानुसार, शनिवार ७ ते ११ ऑक्टोबर यादरम्यान रिक्त पदाकरिता शहरातील ९ परीक्षा केंद्रांवर वेळापत्रकानुसार अमरावती जिल्हा परिषदमधील सहा संवर्गातील रिक्त असलेल्या १४ पदांसाठी पहिल्या टप्प्यात आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

या परीक्षेला चार दिवसात ४ हजार ९१४ परीक्षार्थी सामोरे जाणार आहेत.जिल्हा परिषदेत रिक्त असलेल्या विविध संवर्गातील सरळसेवेच्या ६५३ रिक्त असलेल्या पदांसाठी ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यानुसार आता या पदांसाठी शनिवार, ७ ते ११ ऑक्टोबर अशा चार दिवस चालणाऱ्या ऑनलाइन परीक्षेसाठी परीक्षार्थीच्या संख्येनुसार प्रत्येक दिवसनिहाय एकूण ९ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी होत असलेली भरतीप्रक्रिया ही आयबीपीएस या खासगी कंपनीमार्फत ऑनलाइन घेतली जाणार आहे.

अशी होणार परीक्षा७ ऑक्टोबर रोजी रिंगमन, वरिष्ठ सहायक लेखा- दोन पदासाठी परीक्षा केंद्रावर ५३७ उमेदवार परीक्षा देणार आहेत. तर विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी ८ ऑक्टोबरला शहरातील ९ परीक्षा केंद्रांवर सुमारे २ हजार ३८ उमेदवार परीक्षा देतील. १० ऑक़्टोबर रोजी विस्तार अधिकारी कृषी व आरोग्य पर्यवेक्षक या पदाकरिता ७ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या ठिकाणी दोन सत्रामध्ये सुमारे १ हजार १५० परीक्षार्थी आहेत. तर ११ ऑक़्टोबरला लघुलेखा निम्नश्रेणी, लघुलेखक उच्चश्रेणी व कनिष्ठ सहायक लेखा या पदांसाठी १ हजार १८९ परीक्षार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे. याकरिता पाच परीक्षा केंद्र निश्चित केली असून, तीन सत्रामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षा केंद्रांची सीईओंकडून पाहणीजिल्हा परिषदेतील सरळसेवेच्या रिक्त असलेल्या ६५३ पदांसाठी पहिल्या टप्प्यात शनिवारपासून ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता एकूण ९ परीक्षा केंद्र निश्चित केले आहेत. या परीक्षेच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, परिवीक्षाधीन अधिकारी भाप्रसे अनुकुरी नरेश, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे आदी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षेच्या तयारीची पाहणी केली.

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती