शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धारणी ‘पीओ’त एक कोटींचा हिशेब जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:16 IST

आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महालेखाकारांनी याबाबत आक्षेप नोंदविले आहे. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या पुढ्यातदेखील हा विषय पोहचला आहे.

ठळक मुद्देमहालेखाकारांचे आक्षेप : धनादेश दिले, पण कॅशबुकमध्ये नोंदी नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महालेखाकारांनी याबाबत आक्षेप नोंदविले आहे. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या पुढ्यातदेखील हा विषय पोहचला आहे.जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी योजना, उपक्रम राबविण्याची जबाबदारी धारणी ‘पीओ’कडे आहे. आदिवासी कल्याणासाठी सरकारी योजनांतर्गत आॅईल इंजीन, ईलेक्ट्रिक पंप, गॅसस्टोव्ह, मिरची दळण यंत्र, पिठाची गिरणी, शेवयाचे यंत्र, शिलाई मशीन, दुभते जनावरे वाटपात अपहार झाल्याचे यापूर्वी चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. तसेच टायपिंग, कॉम्प्युटर, इंग्लिश स्पिकिंग, कौशल्य विकास अशा विविध प्रशिक्षणातून निधीचा अपहार झाला आहे. त्यामुळे धारणी ‘पीओ’ने निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ‘एनजी’द्वारा २०१२ - १५ वर्षात निधीत गैरव्यवहार झाल्याचे आक्षेप नोंदविले आहे. धारणी ‘पीओं’ने सन २००९ राबविलेला योजना, प्रशिक्षणावरील निधीमध्ये अपहार झाल्याचे शासनाने गांर्भियाने घेतले आहे. त्यामुळे अखर्चित निधी, बँकेत शिल्लक, कॅशबुकची तपासणी वेगवान सुरू झाली आहे.अपर सचिवांचा ठिय्यालोकलेखा समितीने धारणी ‘पीओ’कडे ५० ते ६० कोटींच्या निधीचे हिशेब जुळत नाही व अखर्चित निधीबाबत आक्षेप आहे. लोकलेखा समितीकडे माहिती पाठवायची होती. मात्र, धारणी ‘पीओ’कडून वस्तुनिष्ठ माहिती मिळाली नाही. त्यामुळे ‘ट्रायबल’चे अपर सचिव सुनील पाटील हे दोन दिवसांपासून अमरावतीत ठिय्या मांडून आहेत.फाईल्स अमरावतीतधारणी प्रकल्प कार्यालयाने केलेल्या खर्चाचा हिशेब जुळत नसल्याने येथील अपर आयुक्त कार्यालयात धारणी येथून शेकडो फाईल्स आणल्या आहेत. धारणी व एटीसी कार्यालयाचे कर्मचारी संयुक्तपणे या फाईल्स तपासत आहे. विभागाचे वित्त व लेखाधिकारी प्रवीण इंगळे यांच्या मार्गदर्शनात फाईल्सचे सर्चिंग सुरू आहे.धारणी ‘पीओं’ची अनियमितता, अखर्चित निधीचा विषय बुधवारच्या लोकलेखा समितीच्या बैठकीत येणार होते. हिशेब मिळाला नाही. हे कारण पुढे करून साक्ष समोर ढकलली.- आ. सुनील देशमुखसदस्य, लोकलेखा समिती.