शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आठ फ्लॅट फोडणाऱ्या चोरांकडून ५ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 22:10 IST

 गुन्ह्याची कबुली : १८५ ग्रॅमचे सोने जप्त 

अमरावती : आंतरराज्यीय टोळीने अमरावती शहरातील आठ फ्लॅट फोडल्याची कबुली पोलिसांनी दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपये किमतीचे १८५ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोकणातील रत्नागिरीतून अटक आहे.

शहरात दुपारच्या वेळेत बंद फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास करणाºया टोळीचा पोलीस शोध घेत होते. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राम गिते, पोलीस हवालदार अजय मिश्रा, नीलेश पाटील, मोहम्मद सुलतान, दिनेश नांदे यांचे एक पथक तयार करून, त्या पथकाला कोकणातील रत्नागिरीत पाठविण्यात आले होते.

पोलिसांनी तेथून आंतरराज्यीय चोरांच्या टोळीतील कैलास चिंतामण मोरे (३९), जयप्रकाश राजाराम यादव, शरद नामदेव मोरे (२४) व अजय प्रताप कटवाल (२४, सर्व रा.धुळे) यांना अटक केली. पोलीस चौकशीत आरोपींनी अमरावती शहरात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना नांदगाव पेठ येथील गुन्ह्यात अटक केली, त्यांची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी केली. आता दुसºया गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या धुळे येथील ठिकाणांरून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.  

महाराष्ट्रसह गुजरातमध्येही केल्या चोऱ्याआंतरराज्यीय चोरांच्या या टोळीने रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, वर्धा, मुंबईसह गुजरात राज्यातही घरफोड्या केल्या आहेत. पोलीस चौकशीत ही बाब पुढे आली.  

या व्यक्तींची घरे फोडलीया टोळीने गाडगेनगर हद्दीतील बाळकृष्ण श्रावण दंदे (५५,रा.मोहननगर), पवन रामराव टेकाडे (४२,रा.श्रमसाफल्यकॉलनी), पंकज श्रीधरराव हरणे (४०,रा.कठोरानाका), सविता राजेंद्र ढोले (४८,रा.रेखाकॉलनी), मिलींद सुधाकर गावंडे (४०,रा. स्वावलंबीनगर), नांदगाव पेठ हद्दीतील शंकर रामकृष्ण निवल (३८,रा.नित्रागण कॉलनी), पवन किशोर शिवनकर (३२,रा.रहाटगाव रोड) व फ्रेजरपुरा हद्दीतील अंकुश श्रीपद जगताप (६१,रा.डेंटल कॉलेजसमोर) यांची घरे फोडल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी