शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षीगणनेत ८० प्रजातींच्या ८५० पक्षांची नोंद

By admin | Updated: February 19, 2017 00:15 IST

गे्रट बॅकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पक्षी गणनेकरिता तरुणाई एकवटली.

पहिल्याच दिवशी तरुणाई एकवटली : वडाळी बांबू गार्डनपासून सुरुवात अमरावती : गे्रट बॅकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी पक्षी गणनेकरिता तरुणाई एकवटली. शुक्रवारी वडाळी बांबू गार्डनमध्ये कॅम्पस बर्ड कॉऊंटिंगअंतर्गत ८० प्रजातीच्या ८५० पक्ष्यांची नोंदी करण्यात आल्यात. या पक्ष्यांची नोंदणी करण्यासाठी पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर, दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे, वेक्स संस्थेचे विशाल गवळी, मनीष ढाकुलकर, ऋतुजा कुकडे यांनी सहभाग नोंदविला. यावेळी महिला महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थिंनींनी बर्ड कॉऊंट, पक्षी नोदींचे महत्त्व व प्रत्यक्ष पक्षी नोंदणी कशी करावी, हे जाणून घेतले. वडाळी बांबु गार्डन, नर्सरी व वडाळी तलाव या तिन्ही ठिकाणी पक्षीमित्रांनी गणना सुरु केल्यानंतर ८० प्रजातींचे ८५० पक्षी मोजण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य हेमा सोनटक्के, प्रवीण मातोडे, पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्राची पालकर, मिनाक्षी राजपुत आदिनी प्रयत्न केले. याशिवाय जळका, सावर्डी तलावावर वेक्स संस्थेचे सौरभ जवंजाळ, दिपाली बाभुळकर व अंजनगाव परिसरात मनीष घुरडे यांनी पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. २० पर्यंत होणार गणनागे्रट बँकयार्ड बर्ड काऊंटींग अंतर्गत विद्यापीठ, विमवि, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वरुड, परतवाडा, मेळघाट व जिल्ह्यातील बहुतांश तलावावर ही पक्षी गणना २० फेब्रुवारीपर्यंत केली जाणार आहे.