शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबानाला’ प्रकरणाचा चेंडू ‘पीडब्ल्यूडी’कडे!

By admin | Updated: June 21, 2017 00:08 IST

अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर तोडण्याच्या सूचनेवर सभागृहात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही.

महापालिका सभागृहात निर्णय : हेमंत पवार-चेतन पवारांची जुगलबंदी, आमसभा गाजली लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर तोडण्याच्या सूचनेवर सभागृहात प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नाही. त्यामुळे आता याबांधकामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी केली जाण्याचे संकेत आहेत. मंगळवारच्या आमसभेत त्याबाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तत्पूर्वी सभागृहात महापालिका आयुक्त हेमंत पवार आणि बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले. कंत्राटी अभियंता जीवन सदार यांच्यामुळे हा पेचप्रसंग उद्भवला.श्री अंबा-एकवीरा देवी विकास आराखड्यांतर्गत अंबानाल्यावरील बांधकामाबाबत १२ जूनला व्हीएनआयटी नागपूरकडून ‘टेक्निकल ओपिनियन’ प्राप्त झाले. स्थायीनंतर हा अहवाल मंगळवारच्या आमसभेत ठेवण्यात आला. अहवालाच्या प्रत ीआणि टिप्पणी सभागृहात वितरित करण्यात आल्यात. मात्र, अंबानाल्यातील काही अनावश्यक पिलर्स पाडण्याची सूचना हेतुपुरस्सर दडविली जात असल्याचा आरोप बसपचे गटनेते चेतन पवार यांनी केला. प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांनी व्हीएनआयटीचा अहवाल वाचून दाखविताना सूचनेचा क्रम बदलविला. काही पिलर्स तोडण्याची सूचना व्हीएनआयटीने केली आहे, असे त्यांनी सर्वात शेवटी सांगितले. त्यावर चेतन पवार यांनी आक्षेप घेऊन अहवालातील मुद्दे टिप्पणीत का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्तांनी उत्तरही दिले. मात्र, त्या उत्तराने पवारांचे समाधान झाले नाही. यावेळी सदार आणि पवारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पिलर तोडल्यास ‘अप्रोच’ बंद होईल आणि पार्किंगचा हेतू साध्य होणार नाही, अशी बाजू प्रशासनाच्यावतीने सदार यांनी मांडली. त्याचवेळी चुकीचे बांधकामाचा आणि आता ते पाडण्यासाठी येणारा खर्च कुणाकडून वसूल करायचा, असा प्रश्न अजय गोंडाणे यांनी उपस्थित केला. एकंदरीत याविषयावर नगरसेवकांनी सभागृह डोक्यावर घेतल्याने व्हीएनआयटी ही खासगी संस्था आहे. त्यांनी दिलेल्या सूचना अव्यवहार्य नाहीत. मात्र, अचूक तपासणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पर्याय असू शकतो, अशी भूमिका मांडण्यात आली. ती सूचना पिठासीन सभापतींनी मान्य केली. ११ ते १.३० या अल्प कालावधीत झालेल्या आमसभेत सुरूवातीला मुरूमाचा मुद्दा आक्रमकरित्या हाताळण्यात आला. त्यानंतर एका खासगी कार्यक्रमाला जायचे सांगत आमसभा स्थगित करण्यात आली.सदारांमुळे नामुष्की!कंत्राटी आणि प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार यांच्यामुळे आमसभेत प्रशासनाला नामुष्कीला सामोरे जावे लागले. ‘व्हीएनआयटी’च्या वीस पानी अहवालात बिनकामी पिलर्स पाडण्याची सूचना पहिल्या क्रमांकावर आहे. ती सूचना ‘जैसे थे’ न सांगता सदार यांनी पिलर्स पाडण्याची सूचना दडविण्याचा प्रयत्न केला. तथापि चेतन पवार यांच्या आक्रमकतेने तो डाव साध्य झाला नाही. सदारांनी अंबानाला, पांदण रस्ता, असा उल्लेख करून पिलर्स तोडण्याच्या सूचनेला बगल देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मुरूमातही ‘सदार’च टार्गेटपावसाळ्यापूर्वी प्रभागनिहाय मुरूम व पाईप पुरविण्यात यावे, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत डवरे, निलिमा काळे यांनी केली. या मुद्यावर सर्वपक्षिय प्रभृती एकत्र आल्या असताना आणि काही नगरसेवकांचा पारा चढल्याने सदार बराच वेळ उत्तर देण्यासाठी पुढे आले नाहीत. यावेळीही सदारांविरूद्ध सभागृहात संताप व्यक्त करण्यात आला. आठ दिवसांत मुरूमाचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना पिठासीन सभापतींनी दिल्या. मात्र, तत्पूर्वी विरोधी नगरसेवकांनी सदारांची लक्तरे वेशीवर टांगली.