शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अंबादेवी मार्ग अतिक्रमणमुक्त

By admin | Updated: May 16, 2017 00:10 IST

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोेलिसांच्या मदतीने सोमवारी अंबादेवी मार्गावरील अतिक्रमण हटवून...

राजकमल-गांधी चौक : दोन ट्रक साहित्य जप्त लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे पोेलिसांच्या मदतीने सोमवारी अंबादेवी मार्गावरील अतिक्रमण हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी तसेच पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला. सदर कारवाई राजकमल ते गांधी चौक, गांधी चौक ते परकोटालगत करण्यात आली.परकोटालगतच्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्ती करण्यात आल्या. कारवाई दरम्यान हातगाड्याधारक त्यांच्या हातगाड्या घेऊन पळत असताना त्यांचा पाठलाग करून अंबागेट ते अंबादेवी मार्गावर त्यांना पकडून त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच प्रभात चौक, नगर वाचनालय परिसरातील कपडे विक्रेते व रघुवीर हॉटेललगतचे खाद्य पदार्थ विक्रेते तसेच पानटपऱ्यांचे अतिक्रमण काढून साहित्य व हातगाड्या जप्त करण्यात आल्यात. याकारवाईमध्ये १५ हातगाड्या व किरकोळ साहित्य असे एकूण दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ठोसरे, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, सहाय्यक विजय गावंडे, मनपा पोलीस पथकातील पीएसआय सुनील जामनेकर व पोलीस कर्मचारी गेडाम, राजेश घुरडे, भारत बघेल, अमोल पान्हेकर, किशोर कनोजे, सतीश खंडारे, संजय कोल्हे व इतर पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी व मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटाओ मोहीम राबविल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे.