शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

सूर्यगंगा नदीचा पर्यायी पूल पुरात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:26 IST

तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाचे काम : जड वाहतूक बंद, नागरिकांचा त्रास वाढणार, नवा पूल पूर्णत्वास केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्यात आले खरे; मात्र तोही निकृष्ट दर्जाचा बांधला असल्याने पहिल्याच पुराच्या ओघात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली असून, अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.येथील सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम विशेष प्रकल्प विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून हा पूल उंच बांधण्याचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्या बाजूला एक पयार्यी पूल बांधण्यात आला आहे. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने या सूर्यगंगा नदीला पूर आला होता,त्यामुळे पर्यायी बांधलेल्या पुलावर पुराचे पाणी गेल्याने रात्रीच हा पूल खचून वाहून गेला. या पुलाला पाण्याने कोरपून नेले आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदार यांनी पर्याय म्हणून या पुलाचे बांधकाम केले. परंतु तो निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभाग यांचे कामावर दुर्लक्ष असल्याकारणाने कंत्राटदारांनी जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नवीन पुलाच्या बांधकामात वापरला. त्यामुळे नवीन पूलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. या पुलाच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सद्यस्थितीवरून येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा चांदूर रेल्वे राज्य महामार्ग असल्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहने धावतात. मात्र, पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने वाहतुकीस आता धोकादायक ठरणार आहे.