शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आधीच तुटवडा, त्यात तीन टक्के डोस वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अधिकतर केंद्र बंद राहत आहेत. अशा स्थितीत तीन टक्के ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अधिकतर केंद्र बंद राहत आहेत. अशा स्थितीत तीन टक्के डोस वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३०.०६ लाख डोस प्राप्त झाले. यातील कोविशिल्डचे ३.५७ टक्के, तर कोव्हॅक्सिनचे १.९८ टक्के डोस वाया गेल्याचा आरोग्य यंत्रणेचा अहवाल आहे.

लसीकरण केंद्रांवर शेवटचे चार, पाच लाभार्थी असले तरी त्यांना लस द्यावीच लागते. त्यामुळे व्हायलमधील शेवटचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही २.७७ टक्के असल्याचे दिसून येते. ज्या दिवशीचे व्हायल त्याच दिवसी वापरावे लागत असल्याने काही डोस रोज वाया जात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ३०,०५,९२० डोस प्राप्त झाले. बुधवारपर्यंत २८,९५,८२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने आठवड्यातील दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुस्की आरोग्य विभागावर ओढवली आहे. याशिवाय रोज सायंकाळी उशिरा दुसरा दिवसाचे नियोजन केल्या जाते. नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचत नसल्यामुळे बरेच वेळा केंद्रांवरून माघारी परतण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर ओढवली आहे. बरेच केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत असल्याचेही दिसून येते.

बॉक्स

आयापर्यंत ३०,०५,९२० लसींचा पुरवठा

अमरावती विभागात आतापर्यंत ३०,०५,९२० लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यात कोविशिल्ड २३,०७,३५०, तर कोव्हॅक्सिनचे ६,९८,५७० डोस आहेत. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ४,८६,४००, अमरावती ७,२२,४४०, बुलडाणा ६,८८,२२०, वाशिम ४,२०,७४० व यवतमाळ जिल्ह्यात ६,८८,१२० डोस प्राप्त झाले आहेत.

बॉक्स

चार तासांत वापरावे लागते व्हाॅयल

लसीकरणासाठी व्हाॅयल उघडल्यानंतर ती चार तासांच्या आत वापरावी लागते, अन्यथा वाया जाते. लसीचा साठा आयलरमध्ये ठेवल्या जातो. केंद्रांत लस ही व्हॅक्सीन कॅरिअरमध्ये ठेवली जाते. यात चार आईस पॅक असतात. यापैकी तीन आतमध्ये व एक बाहेर असतो. यासाठी कंडीशनर आईस पॅक वापरला जातो. दोन ते आठ अंश तापमानात लस ठेवली जाते.

बॉक्स

जिल्हानिहाय वाया गेलेले डोस (टक्के)

जिल्हा कोविशिल्ड कोव्हॅक्सिन

अकोला ३.२८ १.२३

अमरावती ७.२९ ०.३६

बुलडाणा २.७५ २.९३

वाशिम १.०२ २.६४

यवतमाळ ३.५२ २.६९

कोट

लसीकरणात प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्याला लस द्यावी लागते, अशावेळी शेवटच्या व्हाॅयलमधील काही डोस वाया जातात. चार तासांपर्यंतच डोस वापरता येतो.

- डॉ दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी