शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल बांधकामासाठी वाळू द्या, अन्यथा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यातील शासकीय घरकुल मंजूर लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार घरकुल बांधकामाकरिता ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनीे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. अशातच झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत घरकुलाचे कामे पूर्ण करावेत, असा तगादा लावला आहे. विहित मुदतीत घरकुल पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान देण्यास अडचणी निर्माण होतील. जीएसटी कपात घेऊन एक लाख रूपयांतून बाजारमूल्याने ४० हजार रुपये वाळूसाठी लागणार आहेत. परिणामी, घरकुलाचे काम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी सदर मागणीसाठी जिल्हाधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह रवी बिरे, अतुल ठाकूर, सुनील इंझळकर, ज्योतीपाल चवरे, अब्दूल जुनेद, अनिल भोयर, अमीरभाई, रमेश ठाकरे आदी सरपंच व सहकाºयांनी दिला आहे.भंडारा येथे आदेश, मग येथे का नाहीत?शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामसाठी भंडारा येथील जिल्हा प्रशासनाने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा, तहसील प्रशासनाने दिले आहेत. मग अमरावती जिल्ह्यातच का घरकुलांचे लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यास वेळकाढू धोरण का राबविले जात आहे, असा प्रश्न आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.